जिल्हा वार्ताशासकीयशिक्षण

पळशी झाशी येथे मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न; महसूल कायदे, बालकांचे अधिकार आणि नशामुक्तीवर विस्तृत मार्गदर्शन

 

​संग्रामपूर [प्रतिनिधी ] :तालुक्यातील पळशी झाशी येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती तसेच वकील संघ संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पळशी झाशी ग्रा पं कार्यालयासमोर मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा समिती बुलढाण्याचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) पाटील साहेब हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संग्रामपूर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश ढाके साहेब उपस्थित होते.
​शिबिरात मार्गदर्शन करताना ॲड. क्षीरसागर यांनी लहान बालकांच्या मोफत शिक्षणाच्या अधिकाराबाबत सविस्तर माहिती दिली, तर ॲड. सातव यांनी बालकांनी ड्रग्ज व कोणत्याही प्रकारच्या नशेपासून दूर राहावे असे आवाहन करत संबंधित कायद्यांची जाणीव करून दिली. अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश पाटील साहेब यांनी महसूल अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदींसह विविध कायदेशीर मुद्द्यांवर उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले.
​या कार्यक्रमास वकील संघाचे अध्यक्ष ॲड. गुलाबराव गावंडे, तहसीलदार प्रशांत पाटील,वकील संघाचे सचिव ॲड. घाटे, सदस्य ॲड. क्षीरसागर, ॲड. गायकी, ॲड. भोंडे, ॲड. सातव आणि ॲड. सुरळकार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. गायकी यांनी केले, संचालन ॲड. घाटे यांनी केले, तर आभार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी वकील संघाचे सर्व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पळशी झाशी ग्रा पं चे प्रशासक व कर्मचारी , यांच्या सह पीएलव्ही रेखा ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!