महाराष्ट्र

स्वामी दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल; कन्या पूजन व महाआरतीने वातावरण भारावले

लोणार | प्रतिनिधी : लोणार शहरातील प्रसिद्ध दैत्यसुदन मंदिराजवळील स्वामी दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.मंडळाच्या वतीने या काळात दांडिया, दुर्गा चालीसा पाठ, विविध खेळ, महाआरती यांसारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरला तो आजचा कन्या पूजन सोहळा.आज २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मंडळाच्या वतीने विधिवत *दुर्गा पाठ व कन्या पूजन* करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व छोट्या कन्यांचे पाद्यपूजन करून त्यांना देवीचे रूप मानून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थित कन्यांच्या हस्ते माता दुर्गेची महाआरती करण्यात आली. या वेळी संपूर्ण परिसर “जय माता दी” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

महाआरतीनंतर मंडळाच्या वतीने सर्व कन्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्वामी दुर्गा उत्सव मंडळाने अतिशय शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा करून लोणारकरांची मने जिंकली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!