दुषीत पाण्यामुळे पिंप्री माळेगावात ३५ नागरिकांना डायरियाची लागण गावात आरोग्य पथक दाखल शुध्द पाण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे


संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पिंप्री माळेगावाची लोकसंख्या २ हजार असुन गावात पाणी साठवण साठी टाकी आहे ग्रा पं सरपंच शांताराम चिकटे व त्यांचे सहकारी यांनी जातीने लक्ष देऊन १४० गाव पाणी पुरवठ्याचा पाणी टाकीत टाकण्याचा युद्धस्तरावर प्रयत्न केले परंतु कमी दाबा अभावी सदर टाकीत पोचलाच नाही नाईलाजास्त गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीत १४० गाव पाणी पुरवठ्याचे पाणी टाकुन गावाला पाणी पुरवठा सुरु असतांना सदर पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहिरी लगत गावातील सांडपाणी वाहून नेणारा नाला आहे या नाल्याचे पाणी विहिरीत झिरपत असल्याने त्यात १४० गाव पाणी पुरवठ्याची पाईप लाईन लिकीज असल्याने दुषीत पाण्यामुळे गेल्या १५ दिवसा पासुन नागरिकांना पोट दुखी उलट्या सर्दि परसा व पोटा संबंधीत आजाराने डोकेवर काढले पाहता पाहता दिवसेन दिवस डायरियांच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याने नातेवाईकांनी संबंधीत रुग्णांना वरवट बकाल येथील धुर्डे व देशमुख या खाजगी रूग्णालयात यापुर्वी प्रत्येकी ५० रुग्णावर उपचार केले व संबंधीत डॉक्टरांच्या सलल्या नुसार गावातील पाणी ऐवजी इतर पाण्याचा वापर सुरु केला गावात दुषीत पाण्यामुळे रूग्णाची संख्या वाढत असल्याने तालुका वैधकिय अधिकारी डॉ चंद्रकांत मारोडे यांच्या पथकाने भेट देऊन पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी करुन ग्रा पं प्रशासनाला सदर विहिर परिसर स्वच्छ करून बिलीचिंग पावडरचा नियमीत वापर करण्याच्या सुचना दिल्या आरोग्य पथकाने पिंप्री माळेगावातील नागरिकांची तपासणी करुन ५० रुग्णावर प्राथमिक औषध उपचार केले ओआरएस पावडर पाकीट रूग्णांना वितरण करण्यात आले आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेतुन २५ नागरिकांना वानखेड येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्रात औषध उपचार करण्यासाठी रवाना केले तालुका आरोग्य अधिकारी डॉ मारोडे यांनी नागरिकांना पाणी उकळून त्यात ओआरएस मिश्रीत पाणी प्या नेहमी हात धुवा , आपले परिसर स्वच्छ ठेवा पोटा संबंधीत आजार डायरिया आजार , तसेच आरोग्य अबाधीत रहावे यावर विस्तृत मार्गदर्शन केले आरोग्य पथकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रशेखर मारोडे वैधकिय अधिकारी योगेश कड , डॉ दाणे , अभीजीत पाटिल आरोग्य सहाय्यक साथ रोग , आरोग्य सेवक घोरसडे ,आरोग्य सेवक बारबुद्धे आरोग्य सेवक इंगळे , खोडके सहभागी होते
बॉक्स
विहीरीत नाल्याचे सांड पाणी झिरपणार नाही ग्रा पं प्रशासनाने उपाय योजना करणे गरजेचे
पिंप्री माळेगावात संपुर्ण गावात विहिरी वरुन ग्रा पं करवी पाणी पुरवठा करित असतांना गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याचे पाणी सदर विहिरीत झिरपत असल्याने विहिरीतील पाणी दुषीत झाला त्यात १४० गाव पाणी पुरवठयाचे पाईपलाईन लिंकीज व हे पाणी विहिरीत टाकले जाते व गावाला पाणी पुरवठा ग्रा पं करित आहे १ वर्षापुर्वी गावात टाकी बांधकाम झाले परंतु १४० गाव पाणी पुरवठ्याचे पाणी कमी दाब प्रेशर अभावी टाकीत चढत नसल्याने पिंप्री माळेगाव ग्रामस्थांना नाईलाजास्तव दुषीत पाणी प्यावे लागत आहे १४० गाव पाणी पुरवठा योजनेअतर्गत लिकींज पाईप दुरूस्ती करुन पाण्याच्या टाकीत योग्य प्रेशरने पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच विहिरीत नाल्याचे पाणी झिरणार नाही नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा व्हावा याकडे ग्रा पं प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे अशी मांगणी पिंप्री माळेगाव ग्रामस्था कडून जोर धरत आहे



