महाराष्ट्रशासकीय

माता रमाई आंबेडकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करा सामाजीक कार्यकर्ते सुजित बांगर यांची मुख्यमंत्रीकडे मांगणी

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] महामानव घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामध्ये माता रमाईंचा मोठा सिंहाचा वाटा आहे. रमाईंचा त्याग संघर्ष हा जनसामान्यात पोहोचावा याकरिता शासकीय स्तरावरून जयंती साजरी करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर यांनी एका निवेदना व्दारे संग्रामपूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.दरवर्षी समस्त बहुजन समाज ७ फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करत असतो. परंतु शासकीय स्तरावर अधिकृतरित्या ही जयंती साजरी होत नाही. त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी. त्यामुळे विद्यार्थी व जनसामान्य जणांमध्ये माता रमाईंचा आदर्श त्याग समर्पणाची भावना ही देशाच्या जडणघडणीसाठी प्रेरणादायी ठरेल. प्रतिकूल परिस्थितीमध्येही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी व आपल्या परिवारासाठी कष्ट करून आपला आदर्श निर्माण करणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाईंचा इतिहास या निमित्ताने जगासमोर येईल.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी सुजित बांगर,पंकज शेगोकार,अरुण निंबोळकर,रज्जाक सुरत्ने,अकबर सुरत्ने,विकास खंडेराव,गौरमराव वानखडे, प्रकाश डोंगरदिवे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!