शिक्षण

शरीराने मरण पावलेल्या माणुसाच्या सत कार्य कर्तृत्वामुळे त्याची कीर्ती जगात कायम राहते ह भ प दहिकर महाराज  वरवट बकाल येथे शिवपुराण कथेची उद्या महाप्रसादाने सांगता 

संग्रामपूर [ प्रतिनिधी ]”मरावे परी कीर्तिरूपे उरावे”  शरीराने माणूस मरण पावला तरी आपल्या चांगल्या कार्यामुळे, सद्गुणांमुळे आणि कर्तृत्वामुळे त्याची कीर्ती  जगात कायम राहते चांगल्या कृतीतून अमरत्व मिळते शरीराने मृत्यू येणे अटळ आहे, कोणीही कायम जिवंत राहू शकत नाही.मृत्यू झाला तरीही त्याचे नाव, कर्तृत्व आणि विचार लोकांच्या मनात चिरंतन राहतील. हीच खरी अमरत्वाची भावना आहे.
असे संगीतमय शिवपुराण कथेतून हभप गजानन महाराज दहीकर यांनी वरवट बकाल येथे आयोजित शिवपूरान कथा मधून प्रबोधन केले आपल्या विचारांतून आणि कार्यांतून लोकांच्या स्मरणात राहणे.
माणसाने असे कार्य करावे की त्याचा मृत्यू झाला तरीही त्याचे नाव, कर्तृत्व आणि विचार लोकांच्या मनात चिरंतन राहिले पाहिजे. हीच खरी अमरत्वाची भावना आहे महान कलाकारांचे कार्य त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना अमर ठेवते.अवयवदान करून एखाद्या व्यक्तीचा मृतदेह इतरांना जीवन देऊ शकतो, अशा प्रकारेही ‘देह रुपी उरावे’ हे जीवन असे जगावे की शरीराचा अंत झाल्यावरही तुमची ‘कीर्ती’  कायम राहील मानवसेवा करावे आपले जीवन भले करावे हा भाव आपल्या मनात जागृत पाहिजे. शिवपुराण ही भगवान शिवाच्या लीला, महिमा आणि भक्तीवर आधारित १८ पुराणांपैकी एक महत्त्वाची महापुराण आहे, ज्यात शिवलिंगाची उत्पत्ती, पार्वती विवाह आणि शिव-पार्वतीच्या अनेक कथांचा समावेश आहे यात १ लाख श्लोक असल्याचे मानले जाते. तालुक्यातील वरवट बकाल ग्रामस्थ यांच्या वतीने लिंगेश्वर मंदिराच्या परिसरात संगीतमय महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते कथे च्या सातव्या दिवशी  कथेचे वाचन हभप गजानन महाराज दहीकर यांच्या मधुर वाणीतून झाले तर कथा ही दि ३० ला महाप्रसादाने सांगता होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!