राजकीय
वंचीत बहुजन आघाडीची जि प पं स निवडणुकी संदर्भात ईच्छुक पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तालुकाध्यक्ष किशोर भिडे यांचे आव्हान

संग्रामपुर [प्रतिनिधी ] दिर्घकाळा नंतर होऊ घातलेल्या निवडणुक पुर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती चे सर्कल व गट निहाय आरक्षण निर्वाचन विभागा कडून निश्चित करण्यात आले वंचित बहूजन आघाड़ी संग्रामपुर तालुका पदाधिकारी कार्यकर्ते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुकीत ईच्छुक पदाधिकारी यांची चाचपणी तसेच कार्यकर्त्याचे मत जानुन घेण्यासाठी जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गट निहाय महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन दि २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजता पक्ष कार्यालय वरवट बकाल येथे करण्यात आले असुन सदर बैठकीला वंचित बहूजन आघाड़ी आजी माझी पदाधिकारी चार ज़ि प सर्कल व ८ पं स गणातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान वंचीत बहुजन आघाडी संग्रामपुर तालुकाध्यक्ष
किशोर भिडे यांनी केले आहे



