राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार गुणअंगीकरा हभप बाळकृष्ण आमझरे


संग्रामपूर [प्रतिनिधी ] सामाजिक समानता अंधश्रद्धा निर्मूलन , जात, धर्म सामाजिक पार्श्वभूमी विचारात सर्वांना आदर समानतेने वागवण्यावर भर दिला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगीकारा असे आव्हान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साप्ताहिक प्रचार आयोजित कार्यक्रमा प्रसंगी केले आहे
संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे सदर कार्यक्रमास सकाळी आरभ झाला असून याठीकानी शनिवार रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ह भ प बाळकृष्ण आमझरे महाराज यांनी “ग्रामगीता” या काव्यातून ग्रामसंस्कृती आणि आत्मसंयमनाचे विचार मांडले
अंधश्रद्धा दूर करण्यासाठी भजने आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला.शिक्षण जीवनावश्यक आणि व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व सांगितले, जेणेकरून व्यक्ती कर्तृत्ववान बनू शकेल आणि गरजू लोकांना मदत होणार असे त्यांनी सांगितले सदर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रचार कार्यक्रम हा सप्ताह भर तालुक्यातील विविध गावात राहणार आहे यावेळी गावात भजन गीते गायन करत रामधून ग्राम प्रदक्षिणा घालत सायंकाळी प्रार्थना संपूर्ण राष्ट्रसंतांच्या विचाराचे भजन गीतांचा कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी चंदर्भान धुर्डे.
रामदास महाले. समाधान डाबरे.पांडुरंग टाकळकर .काशीराम रोदळे.प्रल्हाद अस्वार.अरुण राठोड.रमेश रावणकर.गणेश रावणकार.मुगुटराव रावणकार.डॉ.चव्हाण .ईगळे गुरुजी यांच्या सह आदि गुरू प्रेमीनी राष्ट्रसंतांच्या विचाराचे भजन गीतांचा कार्यक्रमात आपले विचार मांडून भजन कीर्तन सेवा दिली गावात भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते


