राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संग्रामपुर तालुकाध्यक्षपदी सरस्वती संजय बापट यांची नियुक्ती

राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संग्रामपुर तालुकाध्यक्षपदी सरस्वती संजय बापट यांची नियुक्ती
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पळशी झाशी येथील रहिवासी सरस्वती संजय बापट यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संग्रामपुर तालुकाध्यक्षपदी महिला जिल्हाध्यक्षा वर्षा सुहास वाघ यांनी पक्ष जिल्हा कार्यालयात एका नियुक्ती पत्राव्दारे नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटन बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल
त्याच प्रमाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणीताई खडसे, जिल्ह्याचे नेते माजी मंत्री राजेंद्र शिंगणे , बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रसेन्नजीत पाटील व नरेश शेळके यांच्या मार्गदर्शनामध्ये पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यास तन मन धनाने अथक प्रयत्न कराल ही अपेक्षा पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास नियुक्ती पत्रातुन व्यक्त करण्यात आला राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संग्रामपुर तालुकाध्यक्षपदी सरस्वती संजय बापट यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे



