जिल्हा वार्ता

सत्कार काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल – युवा उद्योजक अमोल व्यवहारे

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] अकोला येथील श्री.शिवाजी महाविद्यालयात आठवे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील अमोल व्यवहारे हे युवा उद्योजक शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव काम सातत्याने करत आहेत.शेतकरी आणि शेतमजुरांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरवठा करून कल्याणकारी वेगवेगळ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच युवक व युवतींसाठी सुद्धा त्यांचे मोलाचे सहकार्य असते. सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखीन कार्याची दखल घेत  अकोला येथील श्री.शिवाजी महाविद्यालयात आठवे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन दि २४ व २५ ऑक्टोबर रोजी पार पडले. या संमेलनामध्ये उद्घाटन सत्र, पुस्तकांचे प्रकाशन,सामाजिक शैक्षणिक,सांस्कृतिक, पत्रकारिता,शेती-उद्योग इत्यादी क्षेत्रात उपयुक्त काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला. सामाजीक कार्यकर्ते युवा उद्योजक अमोल व्यवहारे यांचा सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या तपोपूर्ती सेवेबद्दल अकोला येथील साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष कवी विठ्ठल कुलट, संस्थाध्यक्ष शाम ठक, साहित्यिक पुषराज गावंडे, जिल्हाध्यक्ष अरुण काकड, स्तंभलेखक अरुण मोडक इत्यादी मान्यवरांच्या आणि साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कारामुळे आपली जबाबदारी वाढली असून हा सत्कार आपल्याला भविष्यात निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया  व्यवहारे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!