पातुडर्यात राम मंदिरात प्रभु श्रीराम मुर्ति प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रम
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभु श्रीराम मुर्तिची प्राण प्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी संपन्न होणार आहे यानिमित्त पातुर्डा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन राम भक्तांनी सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले आहे अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हा क्षण आला असुन अयोध्याला प्रत्येकाला जाणे शक्य नसल्याने गाव निहाय आपल्या परिसरातील मंदिर राम मंदिर माणुन प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा घरो घरी दिवाळी साजरी करुन अलौकिक ऐतिहासिक सोहळ्याला भक्तीमय मार्गाने अस्विरमय बनवा असे आव्हाण करण्याचे आव्हान असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले
त्या निमित्त गावातील सर्व मंदिराची रंगरंगोटी सह मंदिर परिसरात रोषणाई भगवे ध्वज लावण्यात आले याच बरोबर घरोघरी भगवे ध्वज लावण्यात आले दि २१ जानेवारी रोजी राम मंदिरात सायंकाळी ७ ते १० सुंदरकांड वाजेपर्यंत सूंदरकांड दि २२ जानेवारी सकाळी काकडा आरती राधाकृष्ण मंदिर येथे, तर सकाळी ७ वाजता श्रीराम दौड आठवडी बाजार पासून ते बालाजी मंदिर,सकाळी साडे आठ ते ११ वाजता भजन कीर्तन, ११ ते २ श्रीराम मंदिरची प्राणप्रतिष्ठा लाईव्ह प्रक्षेपण व आरती श्री बालाजी मंदिर मध्ये १ ते ४ वाजे दरम्यान महाप्रसाद, दुपारी ४ ते ६.३० दरम्यान गावातुन मिरवणूक,देवी मिरवणूक मार्ग मंदिर व घरावर दिवे लाऊन रोषणाई करण्यात येईल तर रात्री साडे आठ वाजता प्रसिद्ध किर्तनकार ह भ प गजानन महाराज दहिकर याचे बालाजी मंदिर मध्ये कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे सर्व धार्मिक कार्यक्रम साठी राम भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन पातुर्डा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे