संग्रामपुर तालुक्यात प्रेम संबंधातुन अल्पवयीन मुलीला गर्भधारणा अल्पवयीन आरोपी विरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील एका गावात त्याच गावातील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन घरी नेऊन शारीरीक संबंध प्रस्तापित केल्याने अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याचा धक्कादायक प्रकार पिडीत मुलीने तामगाव पोस्टेला दिलेल्या फिर्यार्दीवरुन उघडकीस आला याबाबत थोडक्यात हकिकत असे कि तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध प्रस्तापित करुन घरी नेऊन शारीरीक संबंध ठेवल्याने संबंधीत मुलगी गर्भवती तालुक्यातील एका गावातील आरोपी व पिडीत मुलगी एकाच गावातील असुन अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध प्रस्थापीत करुन त्याचे घरी नेऊन मुली सोबत वारंवार शारिरिक संबंध ठेवले त्यामुळे मुलगी गर्भवती राहली तामगाव पोस्टेला पिडीतीच्या नातेवाईकाने तामगाव पोस्टेला दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरुन १७ वर्षीय आरोपी विरूध्द कलम 64(1),64(2) (f), 64(2)(i),64(2) (m), भा.न्या.सं.2023 सह कलम 4,6, पोक्सो- दाखल करण्यात आले तामगाव पोस्टेचे ठाणेदार पंडीतराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे करित आहेत



