एकलारा बानोदा संत खोटेश्वर महाराज विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची ३३ वर्षा नंतर भरली शाळा गेट टुगेदर उत्सहात

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील एकलारा बानोदा येथील संत खोटेश्वर महाराज विद्यालयात १९९१-९२ वर्षी दहावीमध्ये असलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तब्बल ३३ वर्षानंतर गेट टुगेदर संस्मरणीय स्नेहसंमेलन दि ५ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुनानक जयंतीच्या पवित्र दिनी पार पडले.उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाला १९९२ साली कार्यरत असलेल्या शिक्षकांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये गायकी सर यांनी अध्यक्षपदाचा सन्मान देण्यात आला व प्रमुख उपस्थितांमध्ये तत्कालीन शिक्षक. हागे सर, राऊत सर, भोंडे सर, रेखाते तसेच विद्यमान मुख्याध्यापक श्री. ढगे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपले प्रेरणादायी व मार्गदर्शक विचार दिले. सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला. या बॅचमधील अनेक विद्यार्थी शासन-प्रशासन,अभियांत्रिकी, शिक्षण, शेती आदी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून, राष्ट्राच्या प्रगतीत आणि विकासात मोलाचे योगदान देत आहेत.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील अनुभव, शिकवण आणि १९९२ मधील शालेय जीवनातील आनंददायी क्षणांची आठवण सांगितली१९९२ च्या बॅचमधील सध्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ.दिनेश बारी (हागे) हेसुद्धा कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते व त्यांनी “भविष्यातील आदर्श पिढी घडवून सबळ समाज व सक्षम राष्ट्रनिर्मिती” या विषयावर मार्गदर्शन केले. अशोक भुते यांनी आपल्या विचारांतून “एक सक्षम ‘सपोर्ट सिस्टीम’ उभारावी, असा सबळ समाज जिथे प्रत्येक व्यक्तीचा आदर मानव म्हणून केला जाईल, जात, धर्म, आर्थिक स्थिती किंवा पद यांच्या आधारावर नव्हे आणि श्रीकृष्ण–अर्जुन तसेच श्रीकृष्ण–सुदामा यांच्या योग्य मार्गाचे अनुसरण करावे,” असा संदेश दिला. प्रकाश हागे (जि.प. शिक्षक)यांनी आपल्या मनोगतात आपण सर्वांच्या सुखदुःखात सामिल व्हायचे. आपण सर्व खेड्यातील गरिब कुटूंबातील आहोत आपला सर्वांचा एकोपा असावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाला. वंदना पवार (राऊत ), मनोरमा गिरी, सत्यभामा करांगळे (चोपडे), विमल हागे (दातार) या माजी विद्यार्थिनी आणि श्रीक्रृष्ण राजनकार किशोर भोंडे (शिक्षक), मोहन वानखडे, रामविजय म्हैसने (पोस्ट मॅन), शामराव देशमुख, संतोष ठाकरे, नंदु धर्मे, शंकर ढोकणे .मधुकर आवटे , नथ्थू बावस्कार, संजय लव्हाळे (संचालक ख.वि संग्रामपूर), प्रकाश भगत, राजु कुयटे आणि इतर वर्गमित्रांनी हजेरी लावली. रुचकर जेवण आणि भेटवस्तूंच्या वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. वर्गातील सर्व विद्यार्थिनी व त्यांचे पती यांना श्री संत गजानन महाराज यांची प्रतिमा व सोबत शिदोरी देऊन सत्कार करण्यात आला व भावपुर्ण निरोप देण्यात आला.मनीषा कपले-रेखाते ( जि.प. शिक्षिका) आणि दिलीप कोकाटे (शिक्षक ) यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण ढगे, .गणेश भोंडे, . संघपाल तायडे, . भास्कर धुळे, . ख वि संचालक गणेश भुते, दत्तू गाडगे,संजय राऊत यांनी इतर सर्व वर्गमित्रांच्या सहकार्याने केले.कार्यक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला, एकमेकांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा दिला. दिवसाचा समारोप “जीवनभर चालणारे शिक्षण आणि त्याचा सराव, हेच खरे जीवन आहे” या प्रेरणादायी संदेशाने झाला आणि शेवटी सर्व वर्ग मित्र सोबत्यांनी एकमेकांना पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप दिला



