समाजक्रांती आघाडी संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी नबीखान

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु येथील युवा सामाजीक कार्यकर्ते नबीखान बिस्मिल्लाह खान यांची समाज क्रांती आघाडी संग्रामपुर तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तालुक्यातील वरवट बकाल बस स्थानक जवळील जेतवन बुद्ध विहारात समाज क्रांती आघाडी च्या विशेष बैठकीत समाज क्रांती आघाडी पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातुन समाज क्रांती आघाडीचे जिल्हाध्यक्ष केशवराव वानखडे यांनी खान यांची नियुक्ती केली समाज क्रांती आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित तालुकाअध्यक्ष नबी खान याचा गुलपुष्प देऊन सत्कार केला यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष यांनी घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले समाजक्रांती आघाडीचे संस्थापक प्रा मुकुंद खैरे यांचे विचार ध्येय धोरणा नुसार संघटना मजबुत तसेच त्यांचे स्वप्न उद्दिष्टपुर्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचीत तालुकाध्यक्ष खान यांनी व्यक्त केले यावेळी भाऊराव वानखडे , रमेश वानखडे , कैलास पवार , जलाल खान , गजानन वानखडे , तेजराव सुबेदार , बाळू वानखडे सह समाज क्रांती आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते



