जळगाव जा विधान सभा लढविणारे युवा वंचीत नेते डॉ. प्रविण पाटील यांची वंचितला सोडचिठ्ठी

संग्रामपुर [प्रतिनिधी ] जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून सन २०२४ ची निवडणुक लढविणारे डॉ. प्रविण जनार्धन पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा समन्वयक पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या कडे दिला आहे जळगाव जा मतदार संघात एकच खळबळ उडाली असुन राजकिय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे डॉ. पाटील यांनी १५ डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली. हा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे त्यांनी नमूद केले असले परंतु मतदारसंघात विविध चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, पक्षातील स्थानिक पातळीवरील समन्वयाचा अभाव ,अंतर्गत मतभेद यांमुळेच हा निर्णय घेतल्याची बोलले जात आहे डॉ. प्रविण पाटील हे सत्ताधारी असलेल्या एका घटक पक्षात प्रवेश घेणार असल्याची बोलले जात आहे याकडे त्यांचे सर्मथक कार्यकर्त्यांसह राजकिय क्षेत्रातील पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे



