जिल्हा वार्ता
महिला दिना निमित्त कु.अनुजा सुरक्षा सचिन अंभोरे हिचा सत्कार.

अकोला [प्रतिनिधी ] येथील शेजारी फाउंडेशनन न्यू खेतान नगर कौलखेड यांचे मार्फत महिला दिनानिमित कु.अनुजा सुरक्षा सचिन अंभोरे हिचा सत्कार करण्यात आला. व्यक्तृत्व क्षेत्रात विविध कार्यक्रम मध्ये अतिशय मार्गदर्शन पर संवाद साधते.लहान पानापासूनच तिने आता पर्यंत विविध कार्यक्रम मध्ये भाग घेऊन लहान वयातच सर्व महापुरुष यांचे पासून प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करणेस सदैव अग्रेसर असते.अनुजा ही प्रभात किड्स अकोला ची ७ व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे.शाळेतील अभ्यास बरोबरच ती सामाजिक कार्यक्रम मध्ये देखील सहभागी असते.तिच्या याच कार्यामुळे तिला महिला दिना निमित्त मानचिन्ह देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार घेण्यात आला.त्या बद्दल तिने विजय कुमार गडलिंगे अध्यक्ष शेजारी फाउंडेशनन यांचे आभार मानले



