आंदोलनजिल्हा वार्ता

वरवट बकाल बस स्थानक चौकातील अंदाजे १०० वर्षाचे झाड तोडल्यास शोले स्टाईलने लक्षवेधी आंदोलन भाऊ भोजने यांचा इशारा तहसिलदार यांना निवेदन

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण वरवट बकाल येथील बस स्थानक चौक येथे १०० वर्ष जुने वृक्ष असुन सदर वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत येत असुन विद्युत वितरण कार्यालयाच्या संबंधीत अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सदर १०० वर्ष जुने वृक्ष तोडण्यात येत असल्याने वरवट बकाल बस स्थानक चौकातील सदर वृक्ष तोडण्यात येऊ नये तसे आदेश संबंधीत विभागाच्या अधिकारी यांना मनाई करण्यात यावे अन्यथा विद्युत वाहिनीच्या खांबावर किवा टॉवरवर चढून शोले स्टाईलने लक्ष वेधी आंदोलन करण्याचा व माझ्या जिवित्वाची जबाबदार म्हणून संबंधित यंत्रणा जबाबदार राहील ह्याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमुद आहे सदर निवेदन तहसिलदार सह जिल्हाधिकारी , तामगाव पोलीस जेष्ठ पत्रकार तथा सामाजीक कार्यकर्ते भाऊ भोजने यांना दिल्याने एकच खळबळ उडाली असुन वृक्ष प्रेमी कडून भोजने यांचे समर्थन केले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!