आंदोलनजिल्हा वार्ता

राज्यातील वृत्तपत्रांना न्याय द्या व पत्रकार वरिल होणारे अन्याय थांबवा शासना विरूद्ध रोष व्हॉईस ऑफ मिडीया संग्रामपूर तालुक्यात पत्रकारांचे धरणे आंदोलन

 

संग्रामपूर [प्रतिनिधी ] राज्यातील वृत्तपत्र उद्योगावर वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हॉईस ऑफ मिडीया संग्रामपूर तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य पत्रकार व वृत्तपत्र प्रतिनिधींनी एकत्र येत शासनाच्या धोरणांविरोधात तहसिल समोर धरणे देत तीव्र आंदोलन केले व उपस्थित पत्रकारांनी शासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली सन २०११ पासून आजपर्यंत वृत्तपत्र उद्योगाशी संबंधित खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कागद, प्रिंटिंग मटेरियल, केमिकल्स, वीज, वाहतूक तसेच मनुष्यबळ यांचे दर १५०% पर्यंत वाढले आहेत. मात्र, शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिरात दरामध्ये कोणतीही लक्षणीय वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक लहान व मध्यम वृत्तपत्रांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून काही वृत्तपत्रे शेवटची घटका मोजत असुन बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ शासनाच्या योजना, निर्णय व धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य वृत्तपत्रे करत असतात. असे असतानाही शासनाकडून वृत्तपत्र उद्योगाकडे होत असलेले दुर्लक्ष गंभीर अन्याय कारक आहे . सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाची माहिती प्रामुख्याने डिजिटल माध्यमातून प्रसारित केली जात आहे, ज्यामुळे पारंपरिक वृत्तपत्रांना मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनांनी शासनासमोर खालील प्रमुख मागण्या त्या येण्या प्रमाणे राज्यातील सर्व वृत्तपत्रांना किमान १५०% जाहिरात दरवाढ तात्काळ लागू करावी ई-टेंडर व सर्व शासकीय जाहिराती पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध कराव्यातप्रत्येक शासकीय जाहिरातीसाठी किमान २०० चौ.से. आकार निश्चित करावा शासकीय जाहिरातींचे देयक ३० दिवसांच्या आत अदा करावे; विलंब झाल्यास व्याज द्यावे सोशल मीडियावरील अवलंबित्व कमी करून वृत्तपत्रांना प्राधान्य द्यावे पत्रकार व वृत्तपत्र संस्थांवरील अन्याय त्वरित थांबवून समान न्याय द्यावा उपरोक्त मागण्यांसंदर्भात यापूर्वी अनेक वेळा निवेदने देण्यात आली, आंदोलने करण्यात आली; मात्र शासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संग्रामपूर तालुक्यातील व्हॉईस ऑफ मिडीयाचे पदाधिकारी सदस्य पत्रकारांनी एकत्र येत तहसिल समोर एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले होते.पत्रकार संघटनांनी शासनाला आवाहन केले आहे की, लोकशाहीतील वृत्तपत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा भविष्यात वृत्तपत्र उद्योग धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन राज्यव्यापी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया, संग्रामपूर तालुक्याचे अध्यक्ष मिर मकसूद अली, कार्याध्यक्ष दयालसिंग चव्हाण, सचिव सतिश वानखडे, तसेच तालुका अध्यक्ष प्रल्हाद दातार, भाऊ भोजने, काशीनाथ मानकर ,  प्रल्हाद सावतकर, नारायण सावतकर, सचिन पाटील, नंदु शिरसोले, युसुफ शेख ,अशोक आकोटकार, कैलास खोट्टे, सुमेध दमधर, रविन्द्र दांडगे, नामदेवराव येऊतकार, प्रभु पारस्कर ,सुचित धनभर ,सुनील मुकुंद , साबीर खान , डॉ शेख समीर , शेख मतीन , संतोष आगलावे आदी व्हॉईस ऑफ मिडीयाचे सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!