Uncategorized

नेकनापुर जस्तगाव रसत्या दरम्यान दुचाकी अमोरा समोर अपघातात दोघे गंभीर पातुर्डा येथील युवकाला नागपुर ला हलविले

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील २७ वर्षीय युवक संग्रामपुर कडे मीटर बसविण्याच्या कामा निमित्त जात होता तर दोघे अनोनळखी दुचाकीने शेगाव कडे जात असतांना नेकनामपुर फाटा ते जस्तगाव फाट्या दरम्यान रसत्यावर सकाळी साडे अकरा वाजता दोन दुचाकीची अमोरा समोर झालेल्या धडकेत दोन्ही कडेला दुचाकी चालक फेकल्या गेले या अपघातात पातुर्डा येथील कंत्राटवर मिटर बसविण्याचे काम करणाऱ्या संजय बाळू पवार व एक अनोळखी युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली
या बाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि पातुर्डा येथील युवक संजय पवार कंत्राट पेसिकवर काम करित असल्याने नेहमी प्रमाणे पातुर्डा येथुन संग्रामपुर साठी मीटर बसविण्यासाठी शाईन विना पासिंग ने दुचाकीने जात असतांना नेकनामपुर जस्तगाव फाट्या रसत्यावर वरवट कडून येणाऱ्या दुचाकीवर दोघे प्रवास करित होते दोन दुचाकीची अमोरा समोर झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झालेत संजय पवार याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने शेगाव येथे प्राथमिक उपचारानंतर अकोला रेफर केले व वैधकिय अधिकारीच्या सलल्यानुसार उपचारासाठी नागपुर ला हलविले तर दुसऱ्या दुचाकी वरिल अनोळखी व्यक्तीवर अकोला येथे उपचार सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!