आंदोलनकृषीजिल्हा वार्ता

संग्रामपूरात तिन दिवसात ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरु करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन शेतकऱ्यांचा इशारा

संग्रामपूरात  तिन दिवसात ज्वारी खरेदी केंद्र तातडीने सुरु करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन शेतकऱ्यांचा इशारा

​संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाच्या आदेशानुसार नाफेड अंतर्गत ज्वारी खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, अद्यापही अधिकृत खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ज्वारी घरात पडून असून, त्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. शासकिय ज्वारी केंन्द्र सुरु करण्यात यावे अन्यथा ज्वारी उत्पाद शेतकऱ्यांसह लोकशाहि मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातुन ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि प्रशासनाने शेतकऱ्याच्या मांगणीची दखल घेऊन शासकीय ज्वारी केंन्द्र सुरू करुन ज्वारी खरेदी करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तीन दिवसांच्या आत ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही तर सर्व शेतकरी बांधवांसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा युवा शेतकरी विशाल पाटील चोपडे, सुमित मोळे, ओम बहाकर, भागवत चोपडे, राजेश ससत्या, मुरलीधर चोपडे सह ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!