सगोड्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सगोड्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सगोडा येथिल ग्राम पंचायत लगत खोलीत तेवीस वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० आगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली. या बाबत माहिती असे प्रकारे आहे कि गावातील युवकांना खोलीतुन दुर्धन वास येत असल्याने आत पाहिले असता युवक गळफास व कुंजलेल्या अवस्थेत आढळला सदर घटनेची माहिती सोनाळा पोलीसांना समजताच घटना स्थळी दाखल झाल्या नंतर मृतक युवका जवळ आधार कार्ड मिळून आले या वरुन मृतकाचे नाव उमेश बाळू अधाने रा.श्रीराम नगर,राजणगाव (संभाजीनगर )महराष्ट्र असे असुन सोनाळा पोलिसांनी घटनास्थी प्रेतचा पंचनामा केला व सोनाळा पोस्टेला सगोडा पोलीस पाटील महादेव कासोकार यांच्या फिर्यार्दी वरुन सोनाळा पोलीसांनी मर्ग दाखल केला असुन सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदीप काळे यांचे मार्गदर्शनात पुढील तपास बिट जमदार करीत आहेत.


