जिल्हा वार्ता

सोनाळ्यात श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव रात्रभर सुरू ठेवण्याची व सुविधा देण्याची ग्रामस्थांची मांगणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात, सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बहुल भागातील सर्वदुर पर्यंत नावलौकिक संतभूमी सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराजांचा यात्रा महोत्सव दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे रथोत्सव. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी रात्रीपासून रथाची गावातून प्रदक्षिणा काढली जाते. या रथोत्सवासाठी महाराष्ट्रासह विदर्भातील विविध जिल्ह्यांतून तसेच मध्यप्रदेश तसेच सातपुड्याच्या आदिवासी बहुल भागातून मोठ्या संख्येने भाविक व भक्त गण सोनाळ्यात दाखल होतात यात्रेदरम्यान व्यापारी वर्गाकडून विविध दुकाने थाटली जातात. तसेच पाळणे, अगाशी पाळणे, मौत का कुवा ,ब्रेक डान्स,पन्नालाल गाढव यांसह विविध मनोरंजनाची साधने आणि सांस्कृतिक कार्यक्रम व इतर साधने आयोजन केले जाते. रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने व्यापाऱ्यांना अधिक वेळ व्यवसाय करण्याची संधी मिळावी, तसेच भाविकांनाही यात्रेचा आनंद घेता यावा, यासाठी यात्रा महोत्सव हा चार दिवस रात्रभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.या मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश वानखडे,श्रीकांत झाल्टे ,शाम बोरपी ,राजु डांगे ,गजानन पवार व सोनाळा येथील नागरिकांच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे केली आहे यात्रेचा कालावधी चार दिवसांचा असल्याने रात्रीच्या वेळेतही भाविकांची मोठी गर्दी होते हे मात्र विशेष त्यामुळे प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी यात्रेदरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करावे अग्निशामक व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडून यात्रेच्या वेळेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, व्यापाऱ्यांचा विचार करून वेळेत वाढ करण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.
सोनाळा ग्रामसभेतही यात्रेबाबत मोठ्या बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, यात्रा महोत्सव रात्रभर सुरू ठेवण्यास समस्त ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. त्यामुळे यंदाचा श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सव अधिक नियोजनबद्ध पद्धतीने, भाविकांची सुरक्षितता आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचा विचार करून रात्रभर सुरू राहण्याचे गावकरी व निवेदन कर्ताची मागणी आहे

बॉक्स
श्री संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सवाला शेकडो वर्षांची परंमपरा आहे संत सोनाजी नगरि सोनाळ्यात यात्रेसाठी प्रत्येक समाजातील लेकी सह संपुर्ण महाराष्ट्र व विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक व व्यापारी येतात. व्यापारी मोठ्या प्रमाणात दुकाने थाटतात त्यामुळे व्यवसायासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे यात्रा महोत्सवाच्या काळात रात्रभर दुकाने सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी द्यावी सहकार्य करणे गरजेचे
सतिश वानखडे सामाजीक कार्यकर्ते सोनाळा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!