पातुर्ड्यात ३५ वर्षीय युवकाचा दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात मुत्यू

पातुर्ड्यात ३५ वर्षीय युवकाचा दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात मुत्यू
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील अंदाजे ३५ वर्षीय युवकाचा दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात मुत्यू झाल्याची घटना दि ७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली मृतक युवकाचे नाव कैलास महादेव उगले आहे या बाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि तालुक्यातील पातुर्डा येथील कैलास उगले त्याच्या गावातील नातेवाईका सह पातुर्डा फाट्या वरुन गावा कडे दुचाकीने येत असतांना पातुर्डा येथील खडीच्या नाल्या जवळ दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात कैलास उगले सडक वर पडला डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्त मोठ्या प्रमाणात गेले गंभीर अवस्थेत रुग्ण वाहिकेला सईबाई मोटे रुग्णालयात हलविले संबंधीत वैधकिय अधिकारी यांनी तपासणी करुन मृत्यू घोषीत केले सदर दुदैवी घटनेत मृतक कैलास उगले चे कुटुंब उघड्यावर आले मृतकाच्या पश्चात वृद्ध आई , पत्नी , ४ वर्षाची मुलगी असा परिवार आहे
