खासदार मुकूल वासनिक यांची पंचाळा येथे स्वर्गीय रामेश्वर पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट

संग्रामपूर [प्रतिनिधी ] भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस तथा राज्यसभेचे खासदार मुकूल वासनिक यांनी तालुक्यातील पंचाळा येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते संग्रामपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष स्वर्गीय रामेश्वर लक्ष्मण पाटील यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली स्व. रामेश्वर पाटील यांचे सुपुत्र राजेश्वर रामेश्वर पाटील निळकंठ रामेश्वर पाटील पाटील कुटुंबियांची भेट घेऊन आस्तेने विचार पुस करुन धीर दिला स्वर्गीय रामेश्वर पाटील यांच्या स्मृतीना उजाळा देत त्यांचे गुण अंगीकारुन त्यांचा वारसा त्यांची मुलांनी पुढे चालवित असल्याने त्यांचे कौतुक करित कॉग्रेस पक्ष वाढी व संघटन साठी तन मनाने प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली खासदार वासनिक यांनी आपल्या व्यस्त दौऱ्यांमधून विशेष वेळ काढून पंचाळा येथे पाटील यांच्या निवास स्थानी सदिच्छ भेट देऊन स्व. रामेश्वर पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली व त्यांची दोन्ही मुलांची आस्थेने विचार पुस करत “रामेश्वरजींनी आयुष्यभर काँग्रेस पक्षाची निष्ठा आणि जनसेवा जोपासली. त्यांचे अचानक जाणे आपल्या सर्वांसाठीच मोठा आघात आहे, परंतु या कठीण प्रसंगी काँग्रेस पक्ष मी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असल्याचे आश्वासन दिले वासनिक यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे पाटील कुटुंबियांना मोठा नैतिक व भावनिक आधार मिळाला.
यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, माजी आमदार कृष्णराव इंगळे, माजी आमदार राहुल बोंद्रे, पक्ष नेत्या स्वातीताई वाकेकर, राम विजय बुरुंगले, अत्ताऊल्ला पठाण सर , शालिग्राम हागे, गजानन ढगे प्रा मोहन रौदळे , संतोष राजनकार , स्वप्नील देशमुख ,अमोल घोडेस्वार , शेख अफरोज , यांच्यासह जिल्हा कॉग्रेस नेते पदाधिकारी , कार्यकर्ते पंचाळा ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


