बावनबीर येथून २१ वर्षीय तरुण बेपत्ता अज्ञात व्यक्ती कडून अपहरणाचा संशय

बावनबीर येथून २१ वर्षीय तरुण बेपत्ता अज्ञात व्यक्ती कडून अपहरणाचा संशय
संग्रामपूर [प्रतिनिधी] तालुक्यातील बावनबीर येथून २१ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. राहुल शंकर जंजाळ असे या तरुणाचे नाव असून, त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती असे प्रकारे आहे कि राहुल जंजाळ हा शेगाव तालुक्यातील अडसणा येथील रहिवासी असून ह मु बावनबीर ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजल्यापासून तो बेपत्ता आहे. त्याचा शोध घेऊनही मिळून न आल्याने त्याचे फिर्यार्दी मामा दत्तात्रय प्रल्हाद कुकडे वय ५० रा. बावनबीर यांनी सोनाळा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत राहुलला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे सोनाळा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. बेपत्ता राहुलची उंची अंदाजे सहा फूट असून, बांधा सडपातळ, केस काळे आणि रंग सावळा-निमगोरा आहे. बेपत्ता होताना त्याने चॉकलेटी रंगाचा चौकडीचा शर्ट आणि मिलिटरी रंगाची पँट परिधान केली होती. त्याच्या पायात चप्पल किंवा बूट नव्हते असे वर्णन असलेला २१ वर्षीय युवक आपल्या परिसरात मिळून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी किवा सोनाळा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे यांनी केले आहे.


