दुष्काळग्रस्त भागात सरसगट पिकविमा द्या सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष तथा प्रतिभा साहित्य संघ जिल्हाध्यक्ष अमोल व्यवहारे यांची कृषिमंत्री कडे मांगणी

दुष्काळग्रस्त भागात सरसगट पिकविमा द्या सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष तथा प्रतिभा साहित्य संघ जिल्हाध्यक्ष अमोल व्यवहारे यांची कृषिमंत्री कडे मांगणी
संग्रामपुर [प्रतिनिधी ] पिक विमा कंपनी पिक कापणी प्रयोगाच्या आधारावर देत आहे. परंतु कंपनी प्रतिनिधी, तलाठी, ग्राम सेवक, कृषि सहाय्यक हे संगनमताने काही मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्याच्या कडेकडील चांगली बागायती शेतीत दरवर्षी प्रमाणे एकाच एका शेतात करतात, त्या कारणामुळे त्या शेतात आणेवारी उत्पन्न जे जास्त प्रमाणात येते दुष्काळग्रस्त भागात सरसगट पिकविमा द्या अशी मांगणी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष तथा प्रतिभा साहित्य संघ जिल्हाध्यक्ष ( बुलडाणा ) अमोल व्यवहारे यांनी जिल्हाधिकारी मार्फत कृषिमंत्री यांच्या कडे एका निवेदना द्वारे केली आहे कृषिमंत्री बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि यंदाचा दुष्काळ पाहता गावातील हलकी जमीन 80% कोरडवाहु हलकी मध्यम प्रकारची असते. पाऊस न आल्या कारणामुळे तिथे सर्व प्रकारचे पिक वाढले परंतु उत्पन्न मात्र शुन्य झाले. आणि विमा कंपन्यांसाठी पिक कापणी प्रयोगावर आधारीत असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळणे कठीण जाईल, मिळालाच तर तो अतिअल्प प्रमाणात मिळेल त्या कारणामुळे गोरगरीब, छोट्या शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. जिल्ह्यामध्ये होत असलेले पिक पाहणी प्रयोग याची शहानिशा करुन योग्य प्रमाणात शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे यंदाची दुष्काळग्रस्त परिस्थीती लक्षात घेता सरसगट पिक विमा मोबदला शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पिकविमा कंपन्यांना आदेशित करावे व गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मांगणी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष तथा प्रतिभा साहित्य संघ जिल्हाध्यक्ष ( बुलडाणा ) अमोल व्यवहारे यांनी जिल्हाधिकारी मार्फत कृषिमंत्री यांच्या कडे केली आहे


