शिक्षण

श्री शिवाजी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा;

विविध उपक्रमांतून संविधानिक मूल्यांचा जागर...!

चिखली  :-  स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली.

संविधान दिनानिमित्त महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान आणि संविधानासमोरील वर्तमान आव्हाने अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.

यावेळी मार्गदर्शकांनी संविधान निर्मितीचा इतिहास, संविधान सभेचे कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान तसेच नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. सिद्धार्थ मेंढे, संदीप गवई, सुरेश सोळंकी, प्रा. मिलिंद माघाडे, प्रा. दिलीप उन्हाळे, प्रा. किरण पडघान यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, लोकशाहीची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!