शिक्षण

संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्र घडविणे लोकशाहित प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य – ठाणेदार संदिप काळे

संग्रामपुर [प्रतिनिधी] आपल्या देशातील विविध धर्म जातीच्या नागरिकांना एकत्रित करणारी घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राज्य घटना आहे आपल्या संविधानातर्गत देशातील सर्व न्यायलय सह संसद राज्य विधिमंडळ काम करतात संविधानाने तुम्हा आम्हा सर्वांना अनेक हक्क दिले त्यामुळे आपण सर्व स्वातंत्र्य समानतेने जीवन जगतो नागरिकांमध्ये घटनात्मक मुल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मुळ उद्देश असुन संविधान दिन या दिवसांच्या स्मरणार्थ म्हणुन शासकिय निमशासकीय कार्यालयात संविधान दिन साजरा केला जातो संविधान निर्माते डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील राष्ट्र घडविणे लोकशाहित प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन ठाणेदार संदिप काळे यांनी बावनबीर येथील जि प शाळा प्रांगणात तथागत नवयुवक मंडळ , भिम टायगर , सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत संविधान महोत्सव सोहळा प्रसंगी केले ते पुढे म्हणाले कि संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले. तर, त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात प्रत्येक नागरिकांने मुलभुत कर्तव्ये पार पाडण्याचे आव्हान शेवटी ठाणेदार काळे यांनी केले
सर्व प्रथम घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे सह संविधान पुजन मान्यवरांनी केले तदनंतर धम्मदिप लहासे यांनी उद्देशिकाचे वाचन करून आयोजकांच्या वतीने व्यासपीठा वरील मान्यवरांचा सत्कार केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार भास्कर बोंद्रे हे होते तर व्यासपीठावर सरपंच गजानन मनसुटे , उपसरपंच शेख नजीर , मुरलीधर शेगोकार , वंचीत तालुकाध्यक्ष किशोर भिडे , युवा ता अ आशिष धुंदळे , तंटामुक्त अध्यक्ष शेख वसीम , भाऊराव गव्हांदे , वंचीत युवानेते संदिप वानखडे , भालतिडक महाराज , दिपक पहुरकर संदेश वाकोडे यांची उपस्थिती होती या वेळी संविधान दिना निमित्त डॉ समीर शेख , आशिष धुंदळे यांची समायोचित भाषणे झालीत सर्व उपस्थितांनी संविधान दिनी आपण आपली मुलभुत कर्तव्ये व देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली संविधान दिन महोत्स कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तथागत नवयुवक मंडळ ,भीम टायगर ग्रुप , सावित्रीबाई फुले मंडळ पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले यावेळी बावनबीर बीट जमादार विशाल गवई , सोनाळा पोस्टे खुफिया विभागाचे शिंबरे यांनी पोलीस बंदोबस्तात लोकशाही जागरूक जत्था गित गायन कार्यक्रम उत्सहात संपन्न झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!