संग्रामपूर पंचायत समिती समोर आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचे ठीय्या आंदोलन

संग्रामपुर [प्रतिनिधी ] गेल्या ५ वर्षापासून थकीत असलेला २३ महिन्यांचा कोरोणा भत्ता आशा वर्कर्स व गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचार यांचा ग्रामपंचायत स्तरावर थकीत असलेला 23 महिन्याचा कोरोना भत्ता तातडीने देण्यात यावा यासाठी आज १३ जानेवारी रोजी संग्रामपूर पंचायत समितीच्या कार्यालया समोर सीटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी ताई दुबे, तालुका सचिव मंदा मसाळ, गोदावरी खंडेराव यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे या संदर्भात पत्र असून सुद्धा अद्याप कोरोणा भत्ता मिळालेला नाही.सीटू च्या नेत्रुत्वात यासाठी राज्य आयुक्तांपासून तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पर्यंत संघटनेने वेळोवेळी सतत पाठपुरावा केला. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामंचायत कार्यालयास अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी वैयक्तिक रित्या लेखी पत्रव्यवहार सुद्धा केला.परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोरोणा काळात आपल्या जिवाची पर्वा न करता अत्यंत तूटपूंजा मोबदला असताना जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायत ला त्यांच्या कामाची दखल घ्यावी वाटली नाही.कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यंत तूटपूंजा मोबदला असताना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा वर्कर्स गटप्रवर्तक, आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी लोकांमध्ये जाऊन आरोग्याची काळजी घेणे, स्थलांतरितांचा सर्वे करणे, कोविड-19 निगडित सर्व कामे, महा आयुष्य सर्वे करणे इत्यादी स्वरूपाचे महत्त्वाची आरोग्य विषयक कामे अहोरात्र केली. जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने हेल्थ ऑफ लीडर ही उपाधी देऊन त्यांना सन्मानित केले. सरकारने आयुक्त स्तरावरून याच कामाचा दोन वर्षाचा कोरोना विशेष भत्ता देण्याचे परिपत्रक दोनदा काढले.
त्याचाच आधार घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांनी सुद्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत यांना पंचायत समिती मार्फत आदेशीत केले. संघटनेच्या वतीने सुद्धा वेळोवेळी ग्रामपंचायत स्तरावर कोरोणा भत्ता मिळावा. यासाठी जिल्हाभर प्रत्येक ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आली. परंतु ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करण्यात आली. संतप्त झालेल्या आशा व गटप्रवर्तक यांनी या आंदोलन कर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत पंचायत समिती परिसर दणाणून सोडला. कोरोणा भत्ता आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा हम अपना हक्क मांगते है नही किसी से भीक मांगते,असा कसा देत नाही घेतल्या शिवाय राहणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
५ जानेवारी रोजी मोताळा येथून सूरू झालेले हे आंदोलनाचे वादळ,६ जानेवारी रोजी मलकापूर आणि ७ जानेवारी रोजी नांदुरा येथे पार पडले. ८ जानेवारी रोजी चिखली पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.तर १३ जानेवारी रोजी संग्रामपूर पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात आले आहे.संग्रामपूर पंचायत समितीला घेराव घालून ठिय्या आंदोलन आंदोलन करण्या संग्रामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव पायघन यांनी आंदोलनाचे निवेदन स्विकारून तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयास पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्या बाबत आश्वासन दिले.जिल्हा भर करण्यात येत असलेल्या या तालुका पातळीवरील आंदोलनाची जर सरकारने गांभीर्याने तात्काळ दखल घेऊन कोरोना भत्ता अदा केला नाही. तर जिल्हा स्तरांवर १२ फेब्रुवारी रोजी तीवू आंदोलन करण्याचा निर्धार सुद्धा सीटू संघटनेने आजच्या आंदोलनात केलेला आहे. आजच्या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष कॉ.पंजाबराव गायकवाड, उपाध्यक्ष रश्मीताई दुबे, मंदा मसाळ गोदावरी खंडेराव,किरण राजनकर,संध्या दाते, उज्वला वानखेडे, अन्नपूर्णा कुकडे, शशिकला कासदेकर, मंगला मिसाळ, सह मोठ्या संख्येने आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.



