संग्रामपुर तालुक्यातील ग्रा पं कर्मचारी ७ महिण्याचे फरकाच्या रकमे पासुन वंचीत ग्रा पं कर्मचारी युनियनच्या वतीने आमरण उपोषण

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सर्व ग्रा पं कर्मचारी सन २०२० सप्टेंबर ते मार्च २०२२ पर्यंत एकुण ७ महिण्याचे फरकाचे पैसे गेल्या ४ वर्षा पासुन वंचीत असुन पं स समोर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या ग्रा पं कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे तालुक्यात ५० ग्रा पं असुन या सर्व ग्रा पं चे कर्मचारी माहे सप्टेंबर ते मार्च पर्यंत असे ७ महिण्याच्या फरक रकमे पासुन वंचीत असुन संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना माहे सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ मधील फरकाची रक्कम अदयापही मिळाली नाही वेळोवेळी लेखी निवदने दिले व तालुका जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन फक्त आश्वासने मिळाले गेल्या ४ वर्षा पासुन संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी फरकाचे रक्कमे पासून अदयापही मिळाली नाही फरकाची रक्कम पासुन वचित आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये जिल्हा प्रशासना विरुध्द तिव्र असंतोष निर्माण झाला असून ग्रामपंचायत कर्मचारी व त्यांचे कुटुब आर्थिक विवंचनेत सापडले आहेत काही कर्मचारी मानसिक तणावात आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र ग्रा पं कर्मचारी युनियनच्या वतीने तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी लोकशाही मार्गाने अखेर पं स समोर ग्रा महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने तालुकाध्यक्ष श्रीराम निमकडे, सचिव संजय भिसे,योगेंद्र थोरात ,प्रवीण कराडे. गजानन मोरखडे ,शिवाजी कासदेकर , श्याम खंडेतोड , यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे जिल्हा प्रशासन ठोस निर्णय घेऊन फरकाची रक्कम देत नाही तो पर्यंत आमरण उपोषणा सुरूच राहणार असल्याची माहिती ग्रा पं कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आली



