सामाजीक समता शैक्षणीक प्रसार व जातीभेद निर्मुलन महान समाज सुधारक मानवतावादी महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायक भाजपा युवा नेते ज्ञानेश्वर तायडे

संग्रामपुर [प्रतिनिधी ] भारतीय समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांनी १९ व्या शतकात सामाजीक , समता शैक्षणीक प्रसार , जातीभेद निर्मुलनासाठी कार्य केले महात्माफुले भारतीय समाज सुधारणेचे प्रगत तथा मानवतावादी नेते बहुजन एकतेसाठी फुले यांची व्यापक दुष्टी त्यांच्या कार्यातुन समाजाला मिळालेला समतेचा संदेश महत्वाचा व प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन भाजपाचे युवानेते ज्ञानेश्वर तायडे यांनी महात्मा फुले जयंती निमित्त केले ते पुढे म्हणाले कि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या सामाजीक एक चळवळीचा महत्वाचा पैलु म्हणजे मुसलीम समाजाशी असलेला सलोख व सकारात्वक संबंध , महात्मा फुले यांच्या विचारधारेत धर्म ,जात , पंथ, यापेक्षा मानवता सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे त्यांच्या सामाजीक कार्यात हिंन्दु मुसलीम इतर समाजाचा सहभाग होता महात्मा फुले व मुसलीम समाजातील संबंधाची सुरुवात शिक्षणाच्या चळवळी पासुन झाली त्या काळात मुलीसाठी शिक्षण गुन्हा होता तसेच समाजातील कट्टर विचाराच्या लोकांनी प्रचंड विरोध केला मुसलीम समाजातील उदारमतवादी व्यक्ती उसमान शेख यांनी मदतीचा हात दिला स्वताचे घर शिक्षणासाठी खुले करून दिले फुले दाम्पत्यांच्या चळवळीत पहिली मुसलीम शिक्षिका फातीमा शेख सक्रिय झाल्या व पुण्यात फुले दांम्पत्यांनी मुली साठी शाळा सुरु केली सामाजीक चळवळीच्या माध्यमातुन समाजातील अज्ञान , अंध श्रध्दा , जातीय अन्याय दूर करण्याचा आजीवन प्रयत्न केला फुले यांच्या सत्यशोधक समाजात धर्म जात किवा पंथ, भेदभाव नव्हता त्यामुळे शुद्र अशुद्र दलीत विशेष मुसलीम समाजाचे अनेक लोक या चळवळीत सहभागी होते यावेळी सर्व प्रथम आठवडी बाजार स्थित महात्मा ज्योबा फुले यांच्या पुतळ्याचे बहुजन समाज बांधव पातुर्डा ग्रामस्थांच्या वतीने विधिवंत पुजन हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यानंतर भगवान गौतमबुद्ध व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपा जेष्ठनेते कृष्णराव राहाटे , राधाकृष्ण मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ रमेश धर्माळ , महादेव भड ,वासुदेव अढाव , कॉग्रेस नेते गजानन ढोकणे , सेवा निवृत मुख्यध्यापक राम निमकर्डे , डॉ शारंधर बगाडे , ज्ञानेश्वर बगाडे , लोकनियुक्त सरपंच रणजीत गंगतीरे , ग्रामविकास अधिकारी मारोडे, भाजपा युवानेते अजय रहाटे , अभियंता दिपक निमकर्डे , पप्पु पठाण, सुभाष बोपले , दिनकर इंगळे , श्रीकृष्ण मोहनकार , रामदास म्हसाळ , गोपाल बोपले ,अविनाश धर्माळ , प्रशांत अढाव , अविनाश बोपले , भाकरे महाराज , गजानन पुंडे , श्रीकृष्ण हातेकर , अनंता धर्माळ , विठ्ठल वाघ , चंप्पु सेठ चांडक, अरुण गिऱ्हे , दादा तायडे ,अनंता सातव , सुरेश धर्माळ , भानुदास वाघमारे , प्रविण नायशे , अमीत भोगळ सह बहुसंख्यांक पातुर्डा ग्रामस्थ उपस्थित होते


