क्राईमजिल्हा वार्ता

बंद घरातुन साडे पाचलाख रूपयाचे सोन्या चांदीचे दागिणे व १ लाख रोखड लंपास अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल     पळशी झाशी येथीलघटना

 

बंद घरातुन साडे  पाचलाख रूपयाचे सोन्या चांदीचे दागिणे व १ लाख रोखड लंपास अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल     पळशी झाशी येथीलघटना

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पळशी झाशी येथे बंद असलेल्या घरात कोणी नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोंन्डा तोडून घरातील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिणे व १ लाख रोखड लंपास केल्याची घटना पळशी झाशी गावात घडली आहे या बाबत थोडक्यात हकिकत अशा प्रकारे आहे की पळशी झाशी येथील कैलास मारोडे हे घरी हजर नसतांना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कडी कोंन्डा तोडुन घरात प्रवेश करुन घरात ठेवलेल्या दोन लोखंडी अलमारीचे लॉकर तोडुन त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागीणे १९१ ग्रॉम किंमत ५ ३४,८०० रुपये, चांदीचे दागीने २५० ग्रॉम किंमत १० हजार रुपये, व १ लाख रुपये रोखड असा एकुण ६,४४,८००चा मुदेमाल चोरुन घेवुन नेला आहे. तामगाव पोस्टेला कैलास श्रीकृष्ण मारोडे रा पळशी झाशी यांच्या फिर्याद तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम ३३१ (४) ,३०५ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!