पळशी झाशी चोरी प्रकरणाचा तपास लावा अन्यथा तामगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन ग्रामस्थांचा इशारा पळशी झाशी ग्रा पं ने घेतला ठराव

पळशी झाशी चोरी प्रकरणाचा तपास लावा अन्यथा तामगाव पोलीस ठाण्यासमोर आंदोलन ग्रामस्थांचा इशारा पळशी झाशी ग्रा पं ने घेतला ठराव
संग्रामपुर[प्रतिनिधी ] तालुक्यातील पळशी झाशी येथील कैलास मारोडे यांच्या बंद घरात अज्ञात चोरटयाने घरातील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने सह एक लक्ष रोख रक्कम लंपास केल्याच्या घटनेला ८ दिवस उलटुनही पोलीस तपास थंड बसत्यात असुन चोरीचा तपास लावा अन्यथा तामगाव पोलीस ठाण्या समोर आंदोलन छेडण्याचा इशारा पळशी ग्रा पं सह ग्रामस्थांनी एका निवेदना व्दारे तामगाव पोस्टेला दिला आहे
यासंदर्भातील ग्रामपंचायतीचा ठराव व ग्रामस्थांचे निवेदन तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांना देण्यात आले.१९ ऑगस्टच्या रात्री गावाच्या मध्यवस्तीत जबरी चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आठवडा उलटूनही चोरीचा तपास लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलीसांनी तात्काळ चोरीचा तपास लावावा या बाबत पळशी झाशी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन ठरावाची सदर प्रत जिल्हा पोलीस अधीक्षकांही दिला आहे. चोरीचा तपास तातडीने न लागल्यास तामगाव पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा पळशी झाशी ग्रा पं सह ग्रामस्थांनी आहे.


