डम्पिंग ग्राउंडवरील धुरामुळे लहान मुलां सह वृद्धाना श्वसा संबंधीत सदुष्य आजार घनकचऱ्याचे नियोजन करा अन्यथा आंदोलन

संग्रामपूर [प्रतिनिधी ] येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा जाळण्यात येतो. यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे प्रभाग क्रमांक एक व आठ मधील लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांना श्वसनाचे दमा व अस्थमा आजाराचा त्रास होत असल्याची ओरड होत आहे. नगर पंचायतीने याकडे लक्ष देऊन ही समस्या तत्काळ सोडवावी अशी मागणी प्रभाग नं १ व ८ च्या नागरिकां कडून होत आहे.
डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट ही शासन निकषानुसार लावली जात नसल्याचा आरोप संबंधीत त्रस्त नागरिका कडून होत आहे डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा संध्याकाळी पेटवून देण्यात येतो. त्याचा संपूर्ण धूर या दोन्ही प्रभागांमध्ये पसरत असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो घनकचरा अधिकारी यांनी डम्पिंग ग्राउंड शहरा पासुन इतर ठिकाणी हलविण्यात यावे संग्रामपूर नगर पंचायतीने डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विना विलंब नियोजन करावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.


