जिल्हा वार्ता

राष्ट्रप्रथम प्रतिष्ठान च्या वतीने वकाना (रुधाना ) येथे भव्य सैनिक परिवार सन्मान व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

 

संग्रामपुर [प्रतिनिधी] राष्ट्रप्रथम प्रतिष्ठान संग्रामपुर तालुक्याच्या वतीने संत सावता माळी मंगल कार्यालयाच्या बाजुला वकाना ( रूधाना ) येथे आज दि २२ नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य कार्यकर्ता मेळावा तथा सैनिक परिवार सन्मान सोहळा संपन्ना होणार असुन भव्य कार्यकर्ता मेळावा सैनिक परिवार सन्मान सोहळा दरम्यान युवकाचे प्रेरणास्थान खासदार श्रीकांत शिंदे , महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती सचिन अहिर , केंन्द्री राज्य मंत्री खा प्रतापराव जाधव , संभाजीनगर महानगर पालीका उपमहापौर शिवसेना युवासेना समन्वयक अनिकेत जावळकर ,अनिकेत महाराज मोरे (संत तुकाराम महाराज यांचे वंशज ) ‘ श्री सावता माळी महाराज यांचे वंशज श्री सावता महाराज वसेकर यांच्या सह जळगाव जामोद विधान सभाचे आमदार डॉ संजय कुटे , बुलडाणा विधान सभाचे आमदार संजय गायकवाड यांची प्रमुख राहणार असुन शाहिर हरिदास शिंदे यांचा पोवाड्याचा कार्यक्र कार्यक्रम संपन्न होणार आहे भव्य दिव्य कार्यक्रमा प्रसंगी सैनिक परिवार व कार्यकर्त्यांनी नियोजीत दिवशी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान प्रसिद्ध पत्र का व्दारे राष्ट्र प्रथमचे संस्थापक अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक अविनाश तायडे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!