पातुडर्यात सुफी संत हजरत जिंन्दा शाह मदार यांचा उर्स व संदल उत्सहात शांततेत संपन्न

संग्रामपुर [प्रतिनिधी ] सुफी संत हजरत जिंन्दा शाह मदार यांचा उर्स व संदल उत्सहात संपन्न झाला सीरिया जन्मभुमि असुन भारतात सूफी संत यांनी मदारिया सूफी भाईचाराची स्थापना केली संदल एक अनुष्ठान आहे दरर्गावर केले जाते पातुडर्यात संदल हिंदू व मुस्लिम दोन्ही समुदाया साठी एकतेचे प्रतिक आहे हजरत जिंन्दा शाह मदार यांच्या पुण्यतिथी दिनी उर्स शरिफचे आयोजन करण्यात येते जिंदा शाह मदार यांचे नाव बदीउद्दीन अहमद होते एक सूफी संत होते दरगाह व उर्स मोठ्या संख्येने भक्तांना आकर्षित करते धार्मिक एकता सद्भावांचे एक
शक्तिशाली प्रतीक आहे संदल निमित्त गावातुन घोड्या सह वाजत गाजत मिरवणुक काढण्यात येते तर संदल व उर्स निमित्त दुर वरुन नागरिक येतात आपल्या हजरत जिंन्दा शाह मदार वर मंन्नत चढवितात किराणा मेव्याचा रोट बनवुन बाल गोपालांना प्रसाद वितरीत करतात दर्गावर गलेफ चादर इत्र लावुन फातेहा खानी होते सार्वजनिक नंगर निमित्त तारी ,पुलाव , जर्दा बनवुन सामीयानात सर्वांना वितरीत केले जाते सुफी संत हजरत जिंन्दा शाह मदार यांचा संदल व उर्स उत्सहात शांततेत संपन्न झाला यावेळी संदल व उर्फ निमित्त सर्व धर्मीय राजकिय पक्षीय नेते पदाधिकारी सामाजीक कार्यकर्ते यांनी सुफी संत जिंन्दा शाह
मदार दर्गाला भेट देऊन चादर चढवुन दर्शन घेतले संदल निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुक दरम्यान तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता



