जिल्हा वार्ता

अमरावती विभागीय ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त अनंत सातव यांचा सत्कार.

 

संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु.येथील सरस्वती वाचनालयाचे ग्रंथपाल बुलढाणा जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत सातव यांना अमरावती विभागातून शासन स्तरावर मुंबईत ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्त संग्रामपूर तालुका ग्रंथालय संघ व ग्रंथपाल संघ यांच्या वतीने तालुक्यातील वरवट बकाल येथील वसंत सार्वजनिक वाचनालय सभागृहात आयोजीत छोटे खानी सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरवट बकाल
वाचनालयाचे अध्यक्ष वामनराव ढगे होते. तर संग्रामपूर तालुका ग्रंथालय संघाचे तालुकाध्यक्ष शिवकुमार चांडक ग्रंथालय संघाचे जेष्ठ पदाधिकारी हिम्मतराव देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती होती.माॕ सरस्वती व ग्रंथालयाचे जनक डॉ. एस रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत करून ग्रंथ मित्र पुरस्कारकर्ते अनंत सातव यांचा अध्यक्ष वामनराव ढगे यांच्या हस्ते सत्कार करून संग्रामपूर तालुका ग्रंथालय संघ व ग्रंथपाल यांच्या वतीने रामेश्वर पिंजरकर यांनी सातव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ श्री संत गजानन महाराज यांचा फोटो भेट देवून सत्कार केला. यावेळी टुनकी,एकलारा बानोदा,बावनबीर, सोनाळा, सावळी, वकाना, वडगाववान शेगावचे सुलताने, संग्रामपूर आदी सार्वजनिक वाचनालचे वतीने शाल , श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी व तालुक्यात टुनकी येथे प्रथमच स्पर्धकात्मक परीक्षेसाठी अभ्यासिका केंद्र सुरू केल्याबद्दल धर्मेंद्र इंगळे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी शिवशंकर चांडक, वामनराव ढगे , सेवानिवृत शिक्षक वसंतराव बकाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले संचालन गायकी यांनी केले तर आभार प्रदर्शन वसंत बकाल यांनी केले. यावेळी तालुक्यातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी ग्रंथपाल ,नागरिक,वाचक, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!