खंडाळा येथे कायदेविषयक मार्गदर्शनातून दिली माहिती

वाशिम :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ,वाशिमच्या संयुक्त वतीने आज २४ जानेवारी रोजी खंडाळा येथे राष्ट्रीय बालिका दिनाच्या अनुषंगाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी खंडाळा येथील समाज प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष पांडुरंग जाधव होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही.ए. टेकवाणी व शाळेचे मुख्याध्यापक एस.यु. जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके यांनी पोक्सो कायदा व महिलांचे कायदे या विषयावर,ॲड. जी.व्ही.मोरे यांनी बालिका दिवस व नालसा योजना या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन व्ही.पी.लोंढे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री. गुल्हाणे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षकवृंद,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मचारी, लोक अभिरक्षक, विधी स्वयंसेवक व विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.