राजकीय

नगरसेवक म्हणून आश्वासक चेहरा — पत्रकार सैय्यद साहिल सैय्यद राजू*

_प्रभाग ८ मध्ये बदल घडविण्यासाठी निवडणूक रंगणार_

*नगरसेवक म्हणून आश्वासक चेहरा — सैय्यद साहिल सैय्यद राजू*                                                     _प्रभाग ८ मध्ये बदल घडविण्यासाठी निवडणूक रंगणार        चिखली: नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ८ मध्ये आश्वासक चेहरा म्हणून पत्रकारांमधून पत्रकार सैय्यद साहिल सैय्यद राजू हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. समाजातील अनेक वर्षांपासूनच्या समस्या दूर करण्यासाठी आणि स्थानिक विकासाचे नवे ध्येय समोर ठेवत त्यांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. प्रभागातील मतदारांच्या अपेक्षा आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने पत्रकार सैय्यद साहिल यांनी अनेक योजना आणि उपक्रम हाती घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “प्रभाग ८ मधील नागरिकांना पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि शैक्षणिक सुविधा या सर्व बाबतीत सकारात्मक बदल घडविणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.” त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. समाजकार्यात सक्रिय आणि लोकाभिमुख दृष्टिकोन असलेले पत्रकार सैय्यद साहिल सैय्यद राजू हे चिखलीतील तरुण वर्गात लोकप्रिय आहेत. स्थानिक पातळीवर लोकांमध्ये असलेला त्यांचा संवाद आणि कार्यतत्परता पाहता, ते प्रभाग ८ मधील मतदारांच्या विश्वासाचे पात्र ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!