शासकीय

किशोर गारोळे यांनाच नगराध्यक्षपदी निवडून द्याआमदार हारुन खान यांचे गवळीपुऱ्यातील नागरिकांना आवाहन,

किशोर गारोळे यांचा माहोल- विरोधकांची केली पोलखोल

मेहकर प्रतिनिधी : किशोर गारोळे यांनाच नगराध्यक्षपदी निवडून द्या, असे आवाहन वर्सोवा मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार हारुन खान यांनी केले. ते येथील मदीना चौक येथे आयोजित सभेत प्रमुख पाहुणे म्हणून (ता.24)बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमजान हिरा चौधरी तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष रहाटे, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे, अंधेरीचे एकनाथ केरकर, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, युवासेना तालुकाप्रमुख ॲड. आकाश घोडे, शिवसेना उबाठा उपशहरप्रमुख शेख सलमान, माजी नगर परिषद उपाध्यक्ष शेख चॉंदभाई, राष्ट्रवादीचे दत्ता पाटील घनवट, भीमशक्तीचे भाई कैलास सुखदाने, माजी न.प.सभापती भास्करराव गारोळे, सोपान देबाजे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर गारोळे, प्रभाग क्रमांक 3 अ च्या उमेदवार पौर्णिमा गवई, प्रभाग 3 ब चे उमेदवार छट्टू हित्तू गवळी, प्रभाग 4 अ च्या उमेदवार नगमा रफिक गवळी, प्रभाग 4 ब चे उमेदवार पठाण सलमान खान, प्रभाग 5 अ च्या उमेदवार शेख खुर्शीदबी इस्माईल, प्रभाग क्रमांक 5 ब चे उमेदवार शेख सलमान शेख चॉंद, प्रभाग क्रमांक 6 अ च्या उमेदवार दिपाली सांगळे, प्रभाग क्रमांक 6 ब च्या उमेदवार लताबाई जुनघरे, प्रभाग क्रमांक 7 अ च्या उमेदवार शेख शहनाजबी शेख अफसर, प्रभाग क्रमांक 7 ब चे उमेदवार अली राजेक जैनुमिया आदी उपस्थित होते.यावेळी आमदार हारुन खान म्हणाले, की मेहकर शहरातील प्रत्येकजण किशोर गारोळे बनला आहे. त्यामुळे मेहकर शहर हे किशोर गारोळे मय बनले आहे. जात-धर्माच्या नावावर मतदान मागणाऱ्यांना विकासाबाबतचे प्रश्न आवर्जून विचारा, असेही ते म्हणाले. जे आतापर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छता, दर्जेदार स्विमिंग पूल , रोजगार देऊ शकले नाही, त्यांना सपशेल नाकारा. निवडणूक आली की त्यांना जात-धर्म आठवतो, पण एऱ्हवी मात्र स्वत:चेच घर भरायचे असते. केवळ मतापुरताच वापर करणाऱ्यांना आवर्जून धडा शिकवा अन् माणुसकीचे मूर्तीमंत उदाहरण किशोर गारोळे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे ते म्हणाले. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, की किशोर गारोळे हे महाराष्ट्रातून एक नंबरवर आले पाहिजे. राज्यात सर्वाधिक मत घेणारे नगराध्यक्ष म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली पाहिजे. यावेळी प्रा. आशिष रहाटे म्हणाले, की किशोर गारोळे हे मेहकरचा विकास करण्यासाठीच निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका पदाच्या उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतं देऊन विजयी करा. विलासराव चनखोरे म्हणाले, की जे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत, त्यांना आता कसला विकास साधायचा आहे. जे करायचे होते, ते आतापर्यंत का केले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी कैलास सुखदाने यांचेही दमदार भाषण झाले. किशोर गारोळे म्हणाले, की मेहकर शहरातील युवक अन् महिलांना रोजगार देणे, नियमितपणे पिण्याचे पाणी अन् स्वच्छता पुरविणे, शहरामध्ये माणुसकीमय-चैतन्यमय आनंदमय अन् खेळीमेळीचे वातावरण ठेवणे हे माझे ध्येय आहे. तुम्हा सर्वांच्या आग्रहास्तव मी निवडणूक लढवित आहे. तुमच्या आशीर्वादाने प्रचंड मत घेऊन मी विजयी होणार आहे, असा विश्वासदेखिल त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन अन् आभार निसार अन्सारी यांनी केले. या कार्यक्रमासाठी युनुस बागवान, रहिम पठाण, पत्रकार अय्युब पठाण, अकबरभाई गवळी, अमिन चौधरी, इमाम परसुवाले, नुराभाई परसुवाले, रमजान परसुवाले, उस्मानभाई नौरंगाबादी, समीर मिरचीवाले, जावेद चौधरी यांच्यासह गवळीपुऱ्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते अन् किशोर गारोळे यांच्या सर्व चाहत्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!