शासकीय

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची तालुकानिहाय आढावा बैठक; आमदार कायंदेंसह प्रमुख नेते उपस्थित

विदर्भ दस्तक न्यूज नेटवर्क
बुलढाणा प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची तालुकानिहाय आढावा बैठक ऍडव्होकेट नाझीर काझी यांचे अध्यक्षेते खाली मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आणि पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार मनोज कायंदे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, प्रदेश उपाध्यक्ष . टी.डी. अंभोरे पाटील, प्रदेश सरचिटणीस . गिरीधर पाटील ठाकरे, . इरफान अली शेख, जिल्हा कार्याध्यक्ष . शंतनु बोंद्रे, . प्रसाद जाधव आणि . मनोज दांडगे, निलेश देठे रविंद्र डाळीमकर इमरान पठाण यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
बैठकीला प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, विविध फ्रंटल संघटना, विभाग व सेलचे जिल्हाध्यक्ष, फादर बॉडीचे सर्व तालुकाध्यक्ष, विधानसभाध्यक्ष, शहराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद सदस्य तसेच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि लोणार तालुक्यातील पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच, सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीमुळे आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!