राजकीय

चिखली नगर परिषद निवडणूक 2025 : प्रभाग 4 मध्ये राष्ट्रवादी (अजितदादा गट) ची शक्तीप्रदर्शन कॉर्नर मीटिंग!

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बदलाची नवी आशा निर्माण

चिखली प्रतिनिधी :-नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) तर्फे भव्य आणि उत्साहवर्धक कॉर्नर मीटिंगचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रा. निलेश गावंडे, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार निशात अंजुम शेख तौफिक आणि शमीम बी राजू रज्जाक यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला.
या सभेला प्रभागातील नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर, गल्लीबोळात आणि चौकांमध्ये लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महिलांचे गट, युवकांची उपस्थिती आणि ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा या कॉर्नर मीटिंगला विशेष अधोरेखित करत होते. संपूर्ण प्रभागात बदलाची नवी हवा वाहत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते.
सभेत माजी नगरसेवक राजू रज्जाक यांनी आपल्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणारी आपबिती जनतेसमोर मांडली. त्यांनी सांगितले –“पक्षाने दिलेला शब्द मोडला तिकीटाचा अन्याय झाला पण प्रा. निलेश गावंडे यांनी आमच्या अन्यायाला पर्याय दिला. त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास हा सर्वसामान्य जनतेसाठी लढण्याचा नवीन बळ आहे. आता आम्ही प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासासाठी प्रामाणिकपणे लढू.”
त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये जोश निर्माण करत संपूर्ण वातावरण भारावून गेले.
प्रा. निलेश गावंडे यांचे दमदार भाषण – अन्यायाविरुद्ध ठाम लढा प्रा. निलेश गावंडे यांनी आपल्या भाषणात बदल, पारदर्शकता आणि जनआवाजाच्या राजकारणावर जोर दिला. त्यांनी ठामपणे सांगितले—
“आता कुठलाही अन्याय सहन केला जाणार नाही.”
“जनतेने जे सांगितले तेच काम होणार. सत्ता म्हणजे हुकूमशाही नाही, तर जनतेची सेवा.”
“भ्रष्टाचार आणि दादागिरीच्या विरोधात आम्ही सर्व एकदिलाने उभे राहणार आहोत.” “सगळे सोबत लढू.
गावंडे यांच्या या घोषणांनी उपस्थित नागरिकांमध्ये नवीन आत्मविश्वास आणि उमेद निर्माण झाली.
मान्यवरांची भव्य उपस्थिती – शक्तीप्रदर्शनाचे संकेत
या कॉर्नर मीटिंगला राष्ट्रवादी (अजितदादा गट) चे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख –जिल्हाध्यक्ष शंतनुभाऊ बोंद्रे,मनोजभाऊ दांडगे, संतोष परिहार,शेख वसीम या सर्वांच्या उपस्थितीमुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी पक्षाची मजबूत संघटना आणि एकदिलाने लढण्याची तयारी स्पष्ट दिसून आली.
युवकांचा उत्स्फूर्त सहभाग – महिलांची विशेष उपस्थिती
प्रभागातील युवक, महिला, कामगार, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या सभेसाठी दाखल झाले.
रात्री उशिरापर्यंत परिसरात उत्साहाचे वातावरण कायम होते. अनेक नागरिकांनी “आम्हाला बदल हवा आहे” अशी भावना व्यक्त केली. प्रभाग 4 मध्ये राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू,
या जंगी कॉर्नर मीटिंगनंतर परिसरात दोन गोष्टी स्पष्ट झाल्या राष्ट्रवादी (अजितदादा गट) चा जनाधार झपाट्याने वाढत आहे ,अन्यायग्रस्त नेते आणि कार्यकर्ते आता एकदिलाने लढाईत उतरले आहेत, प्रभागात झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे सध्याच्या राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
चिखलीच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये हा कार्यक्रम निवडणुकीच्या वातावरणाला नवा रंग देणारा ठरला असून, आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!