
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील कवठळ करमोडा रसत्याचे काम निकृष्ठ दर्जाचे सुरु असुन सदर रसत्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने नुकसानीचा मोबदला संबंधीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावा अन्यथा शेतकरीना न्याय मिळवून देण्यासाठी कंत्राटदाराच्या विरुध्द न्यायालयत जाण्याचा ईशारा भारतीय राष्ट्रीय किसान कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश पाटील मानखैर यांनी एका निवेदनाव्दारे मुख्यकार्य कार्यकारी अभियंता रस्ते विकास महामंडळ नागपुर यांना दिला आहे
दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि तालुक्यातील कवठळ ते करमोळा नविन रस्ता मंजुर झाला असुन सदर रस्त्याचे काम शेतकऱ्यांना विश्वास घेऊन शेतकऱ्या कडून दानपत्र विना सुरु आहे कंत्राटदार करवी मनमानी केली जात असल्याची ओरड शेतकरी वर्गातुन होत आहे शेतात जेसीबी उभी केली जाते तसेच ज्या ठिकाणी नाल्यासाठी शेतकऱ्याच्या परवानगी नसतांना खोदकाम करुन सिमेंन्ट पाईप टाकले जात असल्याने पिकासह शेतीचे नुकसान करण्याचा सपाटा कंत्राटदारा कडून सुरू आहे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही या बाबत कंत्राटदार कडून उडवा उडवीचे उत्तर देऊन धमकावले जात असल्याचा आरोप नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे सदर रसत्याच्या कडेला शेतकऱ्यांच्या बांधावरिल झाडावर वनविभागाच्या विना परवानगी खुणा करणे सुरू आहे सदर रसत्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने गुण नियंत्रक विभागा कडून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी न्यायलयात जाण्याचा ईशारा भारतीय राष्ट्रीय किसान कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश पाटील मानखैर यांनी संबंधित विभागाला दिला आहे



