संग्रामपुर तालुक्यात वादळी वारा अवकाळी पाऊस सह गारपीट मुळे साळे आठशे हेक्टर शेतातील रब्बी पिक फळ बागाचे नुकसान झाडे उन्मळून पडले, टिन पत्रे उडाले
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यात ढग दाटून आले व अचानक सुसाट वादळी वाऱ्या विजा गर्जना गारा सह पावसाला सुरु झाली यात सुसाट वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील संग्रामपुर, पळशी झाशी , धामणगाव गोतमारे, एकलारा, बानोदा , काकणवाडा , काटेल , कोलद , उमरा , लाडणापुर, टुनकी, बावनबीर, आदि गावातील साडे आठशे हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकां फटका बसला उभे पिक जमीन दोस्त झाली तर गारा सह पावसाने होत्याचे नव्हते झाले कांदा, गहू , हरबरा, उन्हाळी ज्वारी, मक्का, टरबुज रब्बी पिकांसह संत्रा निंबु, केळी फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे ठिक ठिकाणी झाळे उन्मळून पडले, काहि घरावरिल टिनाचे छत उडाले गारा व वादळी सुसाट वाऱ्यामुळे केळी पिक जमीन दोस्त झाले संत्रा व निंबाचा छडा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला बहुताश शेतकऱ्यांचा गहू, हरबरा, उन्हाळी ज्वारी सोंगणी आली होती या तयारीची मजुरांची जुळवा जुळव काढणी यंत्र चालकांना सांगुनही ठेवले होते शेतकरीची लगबग सुरू होती मात्र निर्सगाची अकृपा शेतकरीच्या तोडातील घास हिसकावुन घेतला निर्सगाच्या लहरीपणामुळे पुर्वीचा या वर्षी बोंड अडी मुळे कपाशी पिक , बुरशी रोगाच्या प्रादुर्भामुळे सोयाबीन , तुर या हंगामी पिकांच्या उत्पन्नात घट झाली बहुताश शेतकऱ्यांना उत्पादन खर्च हि निघाला नाही सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिक घेऊन आर्थिक नुकसान भरून काढण्याचे स्वप्न पाहिले मात्र सुसाट वादळी वारा गारपीट सह अवकाळी पावसाने स्वप्न भंग केले नुकसान ग्रस्त शेतकरी आर्थिक डबघाईत आल्याने शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गा कडून जोर धरत आहे
कर्तव्यदक्ष तहसिलदार योगेश्वर टोम्पे व कृषि अधिकारी अमोल बनसोड यांनी केली नुकसान ग्रस्त भागाची पाहणी महसुल कृषि कर्मचाऱ्यांना सर्वे करण्याच्या सुचना
तालुक्यातील संग्रामपुर , पळशी झाशी , एकलारा बानोदा, काकणवाडा, काटेल , कोलद , उमरा, लाडणापुर, टुनकी, बावनबीर परिसरातील शेतीचे अवकाळी पाऊस गारपीट तसेच सुसाट वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिके गहू, हरबरा, कांदा, मक्का, उन्हाळी ज्वारी, पिकासह टरबुज , केळी, संत्रा , निंबु बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या गाव शेत शिवारात जावुन अवकाळी पाऊस गारपीट सुसाट वादळी वाऱ्यामुळे नुकसान भागाची पाहणी करुन तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी महसुल कर्मचारी कृषि विभागाचे कर्मचारी यांना नुकसानी बाबत सर्वे करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या यावेळी कृषि अधिकारी अमोल बनसोड, महसुल, कृषि कर्मचारी सह नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते