सोनाळयात शासनबंदी असलेल्या विक्री साठी साठवुन ठेवलेला चायना मांजाचे ३० रिल जप्त २ विक्रेत्यावर कारवाई

संग्रामपुर [प्रतिनिधी ] शासनाने बंदी घातलेला मानवा सह पशु जनावरांच्या जीवितास घातक ठरणारा सोनाळ्यात चायनीज मांजा विक्रीसाठी साठवून ठेवणाऱ्या दोघां विरुध्द पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत सोनाळा पोलीसांनी कारवाई केल्याने पोस्टे हद्दितील मांजा विक्रेत्यांचे धाबे दणानले आहे याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता दरम्यान सोनाळ्यात गौरव गजानन ढगे वय २३ व विक्रम महादेव ठाकरे वय २५ या दोन आरोपींच्या दुकानावर सोनाळा पोलीस पथकाने छापा टाकला असता शासनाने बंदी घातलेले परंतु विक्री करण्याच्या उद्देशाने साठवुन ठेवलेल्या मोनो केटीसी कंपनीचा ६ हजार रुपये किंमतीचे चायनिज नायलॉन मांजा ३० रिल मिळून आले सोनाळा पोस्टेचे पोहे कॉ विशाल गवई, पो हे कॉ विनोद शिंबरे, पो कॉ इमरान शेख यांनी चायनिज नायलॉन मांजा जप्त केले पोहेकॉ विशाल गवई यांच्या फिर्यार्दी वरुन सोनाळा पोस्टेला आरोपी गौरव गजानन ढगे वय २३ व विक्रम महादेव ठाकरे वय २५ दोघे रा सोनाळा याच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली केली ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ रमेश खरात करत आहेत



