वकाना येथे आग रोखड , सोयाबीन संसार उपयोगी व शैक्षणीक साहित्य भस्म शेतकऱ्याचे १ लक्ष रूपायाचे नुकसान आगीचे कारण अस्पष्ट


संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील वकाना छत्रपती शिवाजी नगर येथील रहिवासी शेतकरी मोहन रामदास उगले यांच्या राहत्या घरी दि ९ डिसेंबरच्या मध्यरात्री अचानक आग लागली त्यात ४० हजार रोखड सोयाबीन ६ किंन्टल , कपडे ३० हजार संसार उपयोगी साहित्य सह मुलांचे शैक्षणीक साहित्य असे एआगीत भस्म होऊन १ लाख रूपायाचे नुकसान झाले आग नेकमी कशी लागली शॉर्ट सर्किटने लागली हे अस्पष्ट आहे
याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुकयातील वकाना येथील शेतकरी मोहन उगले यांचे तिन खोल्याचे टिन पत्राचे छत असलेले घर असुन मागच्या खोलीला अचानक मध्यरात्री आग लागली शेजाऱ्यांना शेतकरी उगले यांच्या घरातुन धुर निघत असल्याचे समजताच त्यांनी संबंधीत शेतकऱ्यांना आवाज दिला व आरडा ओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली तो पर्यंत अचानक लागलेल्या आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले परंतु आगीत सोयाबीन, कपडे , रोखड , संसार उपयोगी साहित्य तसेच मुलांचे शैक्षणीक साहित्य जळून अंदाजे १ लक्ष रूपायाचे नुकसान झाले दि १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता महसुल अधिकारी भिसे यांनी घटना स्थळी भेट देउन पंचनामा केला
👉बॉक्स👈
आगग्रस्त शेतकरी यास सानुग्रही मदत लवकरच देणार तहसिलदार पाटील
तालुक्यातील वकाना येथे आग लागल्याचा समजताच तहसिलदार पाटील यांनी महसुल अधिकारी कडून आढावा घेतला पंचनामा अहवाल नुसार शासकीय निकषाप्रमाणे संबंधीत आगग्रस्त शेतकरी उगले यांना लवकरच सानुग्रही मदत दिली जाणार असल्याचे कर्तव्यदक्ष तहसिलदार प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले



