शिक्षण

शैक्षणीक सहलीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक्ष ऐतिहासीक अनुभुती प्राप्त होतात ! अरुंधती देशमुख   महापरिनिर्वाण दिना निमित्त शैक्षणीक सहल संपन्न 

संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील बापुसाहेब देशमुख विद्यालय व विक्रमराव बापुसाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय निवाणा ची शैक्षणीक सहल मुख्याध्यापीका प्राचार्य अरुंधती राजेश्वर देशमुख यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधुन सहल ओंकारेश्वर येथुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म स्थान असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महू येथे सहल पोहोचल्या नंतर शाळेचे प्राचार्य , विद्यार्थी विद्यार्थ्यां सह शिक्षक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभुमि ऐतिहासिक स्थळाला अभिवादन केले विद्यार्थ्यांना शैक्षणीक ऐतिहासीक अनुभुती प्रत्यक्षात मिळणे हा सहलीचा उद्देश ठेवून पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे माहेर येथील वाड्याला भेट देण्यात आली तेथुन उजैन येथील नविन संताची भुमी (कॉरीडौर ) प्रतिकृती व महाकालेश्वरांचे दर्शन घेऊन सहलीचा परती प्रवास सुरू झाला व निवाणा सुखरुप परत आली सहल मध्ये ९ वी ते १२वीचे विद्यार्थी विद्यार्थीनी सह ऋतृपुर्ण ठाकरे , यशवंत देशमुख , वाल्मिक सुरळकर, प्रा अरखराव ,  प्रा निंबालकर, प्रा देशमुख , प्रा वानखडे आदि शिक्षक सहभागी झाले होते ऐतिहासिक स्मरकांना भेटी व स्थळाचा वारसा पाहून विद्यार्थी मध्ये हर्ष उल्लास आनंदाचे वातावरणात पाहायाला मिळाले  सहल स्मरणात राहिल अशी माहिती प्राचार्य  शिक्षक विद्यार्थ्यांनी बोलतांना दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!