संग्रामपुर खरेदी विक्री संस्थे कडून उपमुख्यमंत्री ना अजीतदादा पवार यांना श्रध्दांजली

संग्रामपुर [प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमत्री ना अजीतदादा पवार यांचा विमान दुर्घटनेत अपघाती निधन महाराष्ट्राची अपरिपित कधीही भरून निघणारी आणि झाली आणि एक दृष्टा नेता काळाच्या पडद्याआड हरवल्या गेला. खरोखरच सुन्न करून देणारी घटना आहे. संग्रामपुर खरेदी विक्री संस्था कार्यालयात छोटे खानी श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली घेण्यात आली
याप्रसंगी खरेदी विक्रीमध्ये श्रद्धांजलीपर खरेदी विक्री अध्यक्ष विश्वासराव वरणकार पाटील व खरेदी विक्री संचालक संजय वाकडे यांनी त्यांच्या जिवन चरित्रा प्रकाश टाकुन त्यांच्या विधायक विकास कामावर आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी खरेदी विक्रीचे माजी अध्यक्ष अरुण बोरोकार , ख.वि.स.चे उपाध्यक्ष गणेश भुते व विक्रीचे संचालक गजानन दाणे , रमेश मारोडे, सुरेश मुरूख, निरंजन इंगळे, माधव आगरकार, सुधीर लव्हाळे, संजय बोरसे , को-ऑपरेटिव बँकेचे मॅनेजर संदीप ठाकरे व बँकेचे कर्मचारी तसेच खरेदी विक्रीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते


