कृषीजिल्हा वार्ता

धामणगाव येथे बांधावर उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांचा शेतकऱ्यांशी संवाद , केळी पिकावर मार्गदर्शन

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील धामणगाव शिवारात बांधावर जाऊन केळी पिका पाहनी करुन केळी पिकां विषयी शेतकऱ्यांशी संवाद साधुन केळी पिक लागवड , उत्पादन , जमीन, खत पाणी रासायनिक फवारणी केळी पिक कापनी या विषयावर उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले शेतकऱ्यांकेळी पिकाचे यशस्वी लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन तसेच फेब्रुवारी मध्ये लागवड उत्तम आहे उती संवर्धित रोपांचा वापर आणि ठिबक सिंचनातून खत व्यवस्थापन आवश्यक आहे. अधिक उत्पादनासाठी खते, योग्य अंतर फूट सूक्ष्म अन्नद्रव्ये (बोरॉन) व वेळेवर किडींचे नियंत्रण महत्त्वाचे आहे केळी पिकावर उपविभागीय अधिकारी काळे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले कि जमीन व मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी असलेली जमीन निवडावी. जमिनीत ६०-९० सें.मी. खोल नांगरणी करून १.८ x १.५ मी. किंवा ५ x ५ फुटावर बेड तयार करावेत .कंद ऐवजी उती संवर्धित रोपांचा वापर करावा. लागवडीसाठी फेब्रुवारी हा काळ उत्तम आहे .खत व पाणी व्यवस्थापन (ठिबक)पाणी केळीला पाण्याची जास्त गरज असते. ठिबक सिंचनाद्वारे सुरुवातीला ५-१० लिटर, ५ व्या महिन्यापासून १५ लिटर प्रति झाड दररोज पाणी द्यावे खते दर १५ दिवसांनी एकदा खते द्यावीत. प्रति झाड १५० ग्रॅम नत्र (N), ६० ग्रॅम स्फुरद आणि १५० ग्रॅम . पालाशचे नियोजन करावे सूक्ष्म अन्नद्रव्ये बोरॉन (B) ची कमतरता टाळण्यासाठी व फळांची गळती रोखण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीतून किंवा फवारणीद्वारे द्यावीत आंतरमशागत भर लावणे लागवडीनंतर २-३ महिन्यांनी पिकाला मातीची भर लावावी बागेत हवा खेळती राहण्यासाठी सुकलेली व जुनी पाने कापावीत लागवडीनंतर योग्य बुरशीनाशकांची फवारणी करावी.केळी वरील किडी ‘केबी बायो ऑरगॅनिक्स’ सारख्या उत्पादनांचा वापर करून पांढऱ्या मुळांचे व्यवस्थापन करावे बागेत ९०% सापेक्ष आर्द्रता आणि २५-२८°C तापमान योग्य मानले जाते. घड पक्व झाल्यावरच कापणी करावी असे शेवटी मार्गदर्शन करतांना शेतकऱ्यांशी संवाद दरम्यान उपविभागीय अधिकारी काळे यांनी केळी पिकांची पाहणी करतांना सांगीतले केळी पिका विषयी शेतकऱ्यांशी संवाद साधण्या करिता धामणगाव येथे अभ्यास दौराचे आयोजन महसुल विभागाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मंडळ अधिकारी उमाशंकर बुरजे , ग्राम महसुल अधिकारी अविनाश खरे , महसुल सेवक थुकेकर , धामणगाव ग्रा पं सरपंच शुभांगी विठ्ठल गोतमारे , शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!