आईबाप समजून घ्या त्यांची जिवंत पणी सेवा करा हृदयस्पर्शी भावनात्मक व्याखान्यात विद्यार्थी पालक महिलांना अश्रू अनावर

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] मुली व मुलांनो दोन मार्क कमी पडले तरी चालतील पण आपल्या आई बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा त्यांच्याशी मोठ्या बोलु नका मुदु भाषेत बोला त्यांची सेवा करा त्यांच्याशी प्रेमळ भावनेने वागा कारण आई – बाप जगातुन निघून गेला तर भीती वरच्या फोटोतील आईबाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही दोन्ही जगाचा राजा आई विना भिकारी याच प्रमाणे संसाराचे आई वडिल दोन चाके आहेत वृद्धप काळ हा बालपण असते त्यांच्या निकडी प्रमाणे मांगण्याची वेळेवर पुर्तता करा खान पाण आरोग्यची काळजी घ्या सर्व बाबीची जाणीव ठेवा असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.वसंत हंकारे यांनी सोनाळा येथे नुकतेच बसस्थानक जवळ असलेल्या बापू स्टेडियमवर सोनाळा ग्रामस्थ व पोलीस स्टेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या न समजलेले आईबाप समजून घेताना या विषयावर बोलताना मांडले.
यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद कन्या शाळा च्या लेझीम पथका सह ढोल व ताशाच्या गजरामध्ये व फटाक्याच्या आतिश बाजी करित सोनाळा ग्रामस्थांनी सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.वसंत हंकारे यांचे स्वागत केले तर डॉ.वसंत हंकारे यांच्या हस्ते 23 वर्ष देश सेवा करणाऱ्या जवान अनिल वानखडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच संत सोनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये संतोष दाभाडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मुला मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे. तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे. ती म्हणजे आपली आई आपल्या आई बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे.आपल्या एखाद्या कृत्याने आई बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले सत्कार मनाशी बाळगा अशी आवाहन त्यांनी मुला – मुलींना केले आहे. ज्या आई-बापाने आपला जन्म दिला मोठे केले अंग खांद्यावर खेळविले त्या आई वडिलांशी चांगल संवाद साधतांना मुदु भाषेचा वापर करा मोठ्या आवाजाने बोलु नका त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणी हे तुम्हाला करावयाचा लागेल असे मुला – मुलींना त्यांनी बजावून सांगितले भविष्यात डॉक्टर,इंजिनियर, वकील, झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले मात्र ते पाहण्यासाठी जर आईबाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैशाचा उपयोग होणार काय..? असा प्रश्न त्यांनी मुला मुलीना उपस्थित केला.
आई-बाबांनी लहानपणी आपल्यासाठी काय केले आहे. हे तुम्हाला चांगले माहिती आहे लहानपणी आपल्याला आईबाप कळत होते. आता मात्र आम्ही कॉलेजला जायला लागलो आम्हाला बंधनात तुम्ही ठेवायला लागले असा तुमचा समज झाला आहे. त्यामुळे आई – बाबा , मम्मी पप्पा तुम्ही आम्हाला आता आवडत नाही. आय हेट यू मम्मी पप्पा अशी वाक्य मुलांच्या तोंडून येऊ लागले आहे. पण असे व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आले आहे.परंतु एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले आईबाप यातून नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही.असा आशावाद डॉक्टर हंकारे यांनी व्यक्त केला जो निराधार त्याला आई-बापाची किंमत विचारा आई बापाची किंमत त्याला विचारा ज्याचे लहानपणीच आई बाप त्याला सोडून गेले आहेत ते तुम्हाला पूर्ण जाणीव करून देतील असे सांगत सणासुदीला आपला बाप कपड्याच्या दुकानात ज्यावेळी नवीन कपडे खरेदी करून देण्यासाठी आपल्याला घेऊन जातो त्यावेळी संपूर्ण दुकान आपले असल्याचा भास होतो कारण पाठीमागे आपला बाप असतो असेही ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष दाभाडे यांनी केले कार्यक्रमाचे सुत्र बध्द संचालन गजानन नेमाळे सर यांनी केले तर आभार सतीश वानखेडे यांनी मानले कार्यक्रमाला सोनाळा पंचक्रोशीतील समस्त नागरिकांनी आपल्या पाल्यासह हजेरी लावली कार्यक्रम यशस्वीते साठी सोनाळा पोस्टेचे अधिकारी पोलीस कर्मचारी सह सोनाळा ग्रामस्थांनी प्रयत्न केले



