सोनाळ्यात जिल्हा परिषद हायस्कुल प्रांगणात भव्य वऱ्हाडी हास्य कवी संमेलन ! ११ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता

संग्रामपुर [प्रतिनिधी] तालुक्यातील सोनाळा येथे भाजपा जेष्ठनेते विजयकुमार भुतडा यांच्या स्मृती पित्यार्थ पी एम श्री जि प हा सोनाळाच्या प्रांगणात दि ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले असुन या वऱ्हाडी हास्य कवी संमेलनात मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा फेम प्रसिद्ध कवी अनंत राऊत , एबीपी हास्य सम्राट नितीन वरणकार , संभाजी नगर च्या सुप्रसिध्द कवियीत्री गुंजन पाटील, सुप्रसिध्द वऱ्हाडी कवी प्रा संजय कावरे , अकोलाचे सुप्रसिध्द गजलकार निवेदक गोपाल मापारी उपस्थित राहणार आहे सदर वऱ्हाडी हास्य कवी संमेलन नियोजीत वेळेवर सुरु होणार असुन महिलांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे सोनाळा पंचकोशीतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान शेख मुसताक शेख रहेमान, प्रा प्रविण उन्हाळे , प्रशांत तिडके , संतोष दाभाडे , राजेश विश्वकर्मा व सोनाळा ग्रामस्थांच्या वतीने एका प्रसिध्द पत्रकाव्दारे करण्यात आले आहे



